दूधवालाच दूध देणार उत्पादकांना न्याय, माजी मंत्री कर्डिले करणार सरकारशी चर्चा…

दूधवालाच दूध देणार उत्पादकांना न्याय, माजी मंत्री कर्डिले करणार सरकारशी चर्चा…

अहमदनगर : राज्यातील दू प्रश्नाबाबत मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 29) जून रोजी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि माजी खासदार सुजय विखे पाटील उपस्थित राहणार आहे.

..त्या जादूगारांचा कौतुक सोहळा कधी?, अनधिकृत पब, बारवरील कारवाईर मराठी अभिनेत्याची पोस्ट 

दहा रुपयाचे अनुदान थेट खात्यावर जमा करा
दरम्यान, या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मला देण्यात आले. कारण दुधाबाबतचे प्रश्न मला माहित आहे. ते मी मांडणार असून सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना दहा रुपयाचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करा, जाचक अटी व केंद्र सरकारने घालून दिलेली अट रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. नगर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी डेअरी चालक व प्लांट धारकांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाभरातील दुध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Urmila Kothare : उर्मिलाचा पांढऱ्या फ्लोरल प्रिंट वन पिस ड्रेसमधील मोहक लूक

या बैठकीत बोलतांना कर्डिले म्हणाले की, दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोडधंदा असून उदरनिर्वाह करण्याचे साधन आहे. मात्र दूधभावा संदर्भात शेतकरी सरकारवर नाराज आहे. सरकारने ५ टक्के अनुदान जानेवारी महिन्यातच जाहीर केले होते. मात्र, जाचक अटी शर्तीमुळे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकले नाही. फक्त 40 टक्केच दूध उत्पादकांना लाभ झाला आहे. पण उर्वरित 60 टक्के शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचलीच नाही, मंत्रालय स्तरावर सरकार निर्णय घेत असताना ग्रामीण भागातील प्रश्न समजून घेण्याची खरी गरज आहे, मात्र अधिकारी वर्ग मंत्रालयात बसूनच निर्णय घेत असतात, त्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नाही, असंही कर्डिले म्हणाले.

दोन लिटर दूध उत्पादकापासून तर थेट 100 लिटर दूध उत्पादकापर्यंत सर्वांनाच शासनाच्या अनुदानाची मदत होणे गरजेचे आहे, यासाठी आज मुंबईत होणाऱ्या दूध प्रश्नाबाबतच्या बैठकीत सविस्तर बाजू मांडली जाईल आणि दुध उत्पादकांना न्याय दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी दुध उत्पादक शेतकरी, डेअरी चालक व प्लांट चालकांनी आपल्या समस्या मांडल्या.

दुध उत्पादकांचा रोष भाजपला महागात पडला
केंद्र व राज्य सरकार शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी विविध योजना तयार करून निर्णय घेत असतात. मात्र, त्याची वेळेवर अंमलबजावणी होत नाही. आता राज्य सरकारने राज्यातील दिंड्यांना 20 हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषण केली. मात्र, अजूनपर्यंत अधिकारी वर्गाने जीआर काढला नाही. लोकसभा निवडणुकीत दुध उत्पादक शेतकऱ्यांचा रोष भाजपला महागात पडला आहे, असंही कर्डिले म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज