Truck Driver Protest : नगरमध्ये इंधन पुरवठा सुरळीत; काही ठिकाणी मात्र पंप बंद

Truck Driver Protest : नगरमध्ये इंधन पुरवठा सुरळीत; काही ठिकाणी मात्र पंप बंद

Truck Driver Protest : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्यातील सुधारणेविरोधात (Hit and Run) ट्रकचालकांनी सोमवारपासून संप (Truck Driver Protest) पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस असून राज्यात संपाला प्रतिसाद मिळाला आहे. या संपाची बातमी येताच सोमवारी रात्रीपासूनच नगर शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर वाहनधारकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. मात्र मंगळवारी सकाळी पेट्रोल-डिझेल पंपांवर तुरळक गर्दी पाहण्यास मिळत आहे. नगर शहरातील  (Ahmednagar) बहुतांश पेट्रोल पंप सुरू (Petrol Pump) असून पेट्रोल-डिझेल विक्री सुरळीत होत आहे. कुठेही वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या दिसत नाहीत. तसेच किरकोळ पंपचालकांनी रात्रीपासून पंपावर इंधन विक्री बंद केली असून बॅरिकेट्स लावून ठेवले आहे.

नगर शहरात पेट्रोल पंपावर सकाळपासून काही ठिकाणी वाहनांच्या किरकोळ रांगा पाहायला मिळत आहेत. पेट्रोल पंप बंद असल्याच्या चर्चेने नागरिकांनी काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर रांगा लावल्या होत्या. या कायद्यास देशभरातील ट्रकचालकांनी विरोध करत नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच एक जानेवारीपासून संप सुरू केला आहे. पहिल्या दिवशी राज्यातील ट्रकचालकही सहभागी झाले होते. वाहनचालकांनी केलेल्या संपामुळे सध्या हा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम; पेट्रोलचा टॅंकर येणार नसल्याच्या भीतीने पंपावर तोबा गर्दी

कायद्यातील बदलाने ट्रकचालक संतापले

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात देशभरात विरोध होऊ लागला आहे. नेमका हा कायदा काय आहे हे आपण जाणून घेऊ. आधीच्या कायद्यानुसार अपघात झाल्यास 1 ते 2 वर्षांची शिक्षा व 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र केंद्राने या कायद्यात मोठी सुधारणा केली. त्यानुसार या कायद्यात 10 वर्षांपर्यंत शिक्षा व 7 ते 10 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसंच, हा गुन्हा अजामीनपात्र करण्यात आला आहे.

राज्यात ट्रकचालक आक्रमक

केंद्र सरकारच्या या सुधारणेविरोधात ट्रकचालकांनी देशभरात संप पुकारला आहे. राज्यातही ठिकठिकाणी ट्रकचालक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे . या संपाला काही ठिकाणी हिंसक वळण देखील लागले आहे. दरम्यान अद्याप अहमदनगर जिल्ह्यात तरी या संपाची धग पोहचलेली नाही. मात्र अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. तसेच पेट्रोल पंपांवर पोलीस प्रशासनाकडून नजर ठेवण्यात येत आहे.

Pune News : पोलिसांचं यश! लोणी काळभोर येथील टँकर चालकांचा संप टळला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube