‘ओबीसी एक आग, आगीत पडूच नका’; नाना पटोलेंचा सरकारला सल्ला
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, मराठवाड्यातील मराठा कुणबी समाजाला कुणबीचे दाखले द्यावेत, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे जालन्यात आमरण उपोषणाला बसले आहेत, सरकारने जरांगेंची मागणी केल्यानंतर मराठवाड्यातील मराठा कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या सवलती मिळणार आहेत, त्यावरुन आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिला आहे. ‘ओबीसी ही एक आग आहे, आगीत पडू नका’, असा सल्लाच नाना पटोले यांनी सरकारला दिला आहे.
लिव्ह इन रिलेशनशिपचे पूर्ण स्वातंत्र्य; धमक्या मिळणाऱ्या जोडप्याला संरक्षण द्या : हायकोर्टाचे आदेश
एकीकडे मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाला दाखले देऊन ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण द्यावं, अशी मागणी जोर धरत असतानाच आता ओबीसी नेतेही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे, आधीच 27 टक्के आरक्षणामध्ये ओबीसी समाजाच्या 400 जागा आहेत, त्यामुळे मराठा कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्यास कोणत्याही समाजाला काहीही मिळणार नसल्याची भूमिका ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे. अशातच आता विरोधकांकडूनही ओबीसीच्या पाठीमागे उभं राहुन त्यांची या आगीत पडू नये, असा इशारा पटोले यांना दिली आहे.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रालासुद्धा मणिपूर करण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात असून मराठा समाजाची १६ टक्के आरक्षणाची मागणी होती. आता ओबीसी आणि मराठा यांच्यात भांडण लावण्याचे काम होत आहे. ओबीसी आग आहे, या भानगडीत सरकारने पडू नये. जातिनिहाय जनगणना हा यावरचा उपाय आहे. मात्र सत्ताधारी भाजप अजूनही त्याला विरोध करत आहे.
TYFC Trailer Out : भूमि पेडणेकरचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज; थॅंक्यू फॉर कमिंगचा ट्रेलर रिलीज
काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जातिनिहाय जनगणना करू, असा ठराव रायपूरला करून घेतला. सेन्सेस झालं पाहिजे. भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ‘फोडा आणि राज्य करा’ अशी एकेकाळची इंग्रजांची भूमिका भाजप वठवत आहे आणि आपसांत भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
Horoscope Today : आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा लाभ होण्याची शक्यता
पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात दोन टक्के आरक्षण राहिले आहे. सर्वच समाजाची संख्या वाढली आहे. तिथं आजही लोक मुख्य प्रवाहात आलेले नाहीत. ५० टक्के सिलिंग तुटले पाहिजे. अधिवेशन बोलवत आहात आणि अजेंडा पुढे येत नाही. मणिपूर पेटले आहे, पण पंतप्रधान बोलायला तयार नाही, हे काय चाललं? असा सवालही नाना पटोले यांनी केला आहे.
दरम्यान, सरकारने स्वतःच्या चुकीमुळे ओबीसी-मराठ्यांत भांडण लावू नये. जातिनिहाय जनगणना केली पाहिजे आणि ४० टक्के आरक्षण सीमा काढून टाकली पाहिजे. मात्र सरकार गैरसमज पसरवत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी दिला आहे.