वसुधा पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला.मुंबईतील विधिमंडळ दालनात आयोजित ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यशासनाच्या महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने वसुधा प्रकल्प अर्थात भिक्षेकरी पुर्नवसन व स्वावलंबनाच्या उद्देशाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर […]
मुंबई : मुंबई (Mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मात्र, मुंबईत अधिकृत IFSC नाही आहे. मुंबईत आयएफएससी नसतांनाही मुंबई वेगवेगळ्या वित्तीय रॅंकिंगमध्ये (Financial Ranking) बाजी मारून आपलं स्थान वरचढ करत आहे. आताही मुंबईने जागतिक वित्तीय सेवा केंद्राच्या रॅंकिंगमध्ये 61 वे स्थान प्राप्त केले. यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्र सरकारवर टीका करत […]
Budget Session : राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याच्या घटनेची सरकारी पक्षाने दखल घेतली नाही. कारवाई करण्याचा शब्द देऊनही कारवाई केली नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीही सरकारने मान्य केली नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे असा आरोप करत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सरकारला पाठीशी घालण्याच्या भूमिकेचा निषेध करत आज विरोधकांनी सभात्याग […]
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कंपनीचा सीईओ (Company CEO ) योगेश सुरेश मोगरे यांच्यावर गुरुवारी (दि.२३) रात्री ७:४५ वाजेच्या सुमारास २ अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने ८ ते १० वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे. (Nashik Crime) फाळके स्मारक भागात मुंबई- आग्रा महामार्गालगत असलेल्या आंगण हॉटेलसमोर ही धक्कादायक घटना घडली (Nashik […]
मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यातमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे राज्याची चिंता वाढली असून शुक्रवारी एकाच दिवसात राज्यात तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन करण्यात येत आहे. दरम्यान राज्यातील कोरोना रूग्णांची आकडेवारी सांगायची झाली तर शुक्रवारी एकाच दिवसात राज्यात 343 रूग्ण आढळून आले. […]
मुंबई: माझ्यावर जे आरोप करण्यात आले ते एैकीव माहितीवर करण्यात आले आहेत असे उच्च न्यायालयाने जामिन देतांना निरीक्षण नोंदविले आहे. चांदीवाल आयोगामध्ये सुध्दा आरोप करणाऱ्यांनी सांगीतले की आमच्याकडे पैश्याची मागणी केली नाही आणि आमच्याकडे कोणतेही पुरावे नाही असे शपथेवर सांगीतले अशी माहिती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अंतीम आठवडा प्रस्तावदरम्यान भाजपाच्या काही आमदारांनी अनिल […]