मुंबई : माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात (Accident) झालेला आहे. काशिमीरा भागात त्यांच्या कारला डंपरने धडक दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या धडकेत दीपक सावंत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत आधिक माहिती अशी, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत (Deepak Sawant) पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करायला […]
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांचे विश्वासू समजले जाणारे सुभाष भारतीय यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सुभाष भारतीय ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील एक महत्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना निवडणुकीत धक्का बसणार असल्याचं बोललं जातंय. सुभाष भारतीय […]
नाशिक : “देशातील असं एकही राज्य नाही जिथं मी काँग्रेस पक्षाचं संघटनात्मक काम केलं नाही. राज्यातील एकही तालुका आणि गाव नाही, जिथं मी काँग्रेसचं संघटनात्मक काम केलं नाही.” असं वक्तव्य नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी केले आहे. नाशिक येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसमधून बाहेर पडून सत्यजित तांबे यांनी स्वतः […]
नाशिक: नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने येऊन शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवळाली गाव परिसरात काल सायंकाळी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकात राडा होऊन शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्नील याने बंदूक काढत हवेत गोळीबार केल्यामुळे […]
अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयात काल दुपारच्या दरम्यान दोन गटांत वाद झाल्याची घटना घडली. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीत म्हंटलं की, अहमदनगर महाविद्यालयात शिकत असलेल्या करण पाटील नामक विद्यार्थी त्याच्या मित्रांसह महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठीचं निवेदन देण्यासाठी प्राचार्यांच्या कार्यालयाकडे जात होता. पाटील प्राचार्यांच्या कार्यालयाकडे जात असतानाच […]
कोल्हापूर : सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना पक्षाने डावलले नसून कोणी उमेदवारी घ्यायची याचा निर्णय तांबे कुटुंबियांनी घ्यायचा होता. काँग्रेस तसे अधिकार त्यांना दिले होते असे परखड मत कॉंग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) यांनी व्यक्त केले. ते आज कोल्हापूरात सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासह पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पत्रकार परिषदेत नाशिक पदवीधर […]