अहमदनगर : संभाजीनगर आणि धाराशिव नामकरण याचा विषय हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये असतानाच त्यावेळेला घेतला होता. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहराचे नामांतरण आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळातच केलं होतं. पण नामांतरणाच्या पुढील गोष्टी ह्या केंद्र सरकारच्या हातामध्ये असतात. मात्र नामांतरण जेवढं महत्त्वाचं आहे, तितकंच महागाई कमी करणे, तरुण-तरुणींना रोजगार देणे महत्त्वाचे […]
अहमदनगर : राज्यात नुकताच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी सत्ता संघर्षात व्यस्त आहे. मात्र शेतकरी राज्यकर्त्यांची खुर्ची उचकटून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित […]
अहमदनगर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एकही महिला मंत्री नाही, हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Leader of Opposition Ajit Pawar) सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अजित पवार हे आज पाथर्डी (Pathardi) येथे आले असता त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी इथे एका जाहीर सभेत मंगळवारी ते बोलत होते. यावेळी पवारांनी चौफेर […]
मुंबई : (प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी) राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पाहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. देवेंद्र फडणवीस हे एक अभ्यासू नेते आहे. विशेषता अर्थसंकल्प सादर झाल्यावर त्यावरची मांडणी ते ज्यापद्धतीने करतात ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असायची. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी देखील खाजगी संस्थेमार्फत राज्याची आर्थिक परिस्थिती समजावून सांगणे. […]
पाथर्डी : महाविकास आघाडीने (MVA) एकदिलाने काम केल्याने कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) भाजपचा उमेदवार पडला. ते भाजपला इतके जिव्हारी लागले आहे की ते म्हणतात आम्ही जोमाने काम करू, असे भाजपचे (BJP) नेते म्हणत आहे. मग आम्ही काय गप्प बसणार आहे का, जोम काय फक्त तुमच्यात आहे का, आम्ही पण डबल जोमाने काम करू आणि येणाऱ्या […]
धर्माचे किंवा जातीचे नाव घेऊन भांडणे लावायचे. समाजात भेद निर्माण करणे व दहशत निर्माण करणे ही पद्धत चुकीची असून हे लोकशाहीला मान्य नाही, अशी टीका माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित बैठकीत थोरात यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद साधला त्यावेळी ते बोलत […]