मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना 16 दिवसांच्या उपचारानंतर आज ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील काही दिवस मुंडेना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला ब्रीच कॅन्डीच्या डॉक्टरांनी दिला आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्या कारला दि. 3 जानेवारी रोजी मध्यरात्री नंतर परळी येथे अपघात […]
मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची चौकशी केली जाणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. नांगरे यांच्यासह सुवेझ हक आणि डॉ.शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. मागील दोन वर्षांपासून या आयोगासमोर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. याआधी अनेक […]
रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जवळील रेपोली गावाजळ ट्रक आणि कारचा भीषण झालाय. या अपघातात आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलं नाही. अपघाताची माहिती मिळताच रायगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. भीषण अपघातामुळं काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक खोळंबली […]
अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्हिडिओ कॉलद्वारे नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस केली आहे. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील अपघातात जखमी झालेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केलीय. नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला […]
अहमदनगर : काँग्रेसमधला शेवटचा तरुण म्हणजे राहुल गांधी असल्याची खोचक टीका नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील(sujayvikhepatil) यांनी केलीय. यावेळी त्यांनी राहुल गांधी (rahulgandhi) यांच्यासह काँग्रेस (Congress) पक्षावर सडकून टीका केलीय. ते अहमदनगर शहरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. विखे पुढे बोलताना म्हणाले, मी काँग्रेस पक्षामध्ये असताना पाहिलंय की, काँग्रेसचे नेते आपली आपली […]
औरंगाबाद : एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी औरंगाबाद गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे(vishaldhume) यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. विशाल ढुमे यांच्या निलंबनाबाबत राज्याच्या गृहविभागाकडून आदेश पारित करण्यात आला आहे. निलंबनाचा आदेश असेपर्यंत ढुमे यांना औरंगाबादमधील पोलिस मुख्यालय सोडून न जाण्याचे आदेश देण्यात आलेत. जोपर्यंत निलंबनाचे आदेश अस्तित्वात असतील तोपर्यंत विशाल ढुमे यांना औरंगाबाद […]