पुणे : वाळूच्या धंद्यामुळे निवडक लोक श्रीमंत झाले, तसेच बाळूच्या उपशामुळे नदी किनाऱ्याचा शेतकरी उध्वस्त झाला. बाळू उपश्यामुळे नदी किनाऱ्याच्या जमिनी अस्तित्वात राहिल्या नाही. यामुळेच यापुढे राज्यातील वाळू लिलाव कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात राज्य शासन लवकरच स्वतंत्र धोरण आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केली. नारायणगाव येथील […]
जळगाव : हौसेला मोल नसतं, असं म्हणतात आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला लोकं तयार असतात. जिल्ह्यातील अमळनेर येथील बिल्डर सरजू गोकलानी यांचा मुलगा आशिष याचे आज गुरुवारी लग्न आहे. सून सिमरन हिला पुण्याहून अमळनेरात येण्यासाठी पुण्याहून हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. वधूला सासरी आणण्यासाठी वरपित्याने थेट हेलिकॉप्टरने प्रवास करत अमळनेरला आणलं आहे. या फंड्याची चर्चा […]
पुणे : राज्यात आमदारांच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आमदारांच्या गाड्यांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार जयकुमार गोरे एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावले. तर गुरुवारी काय झाडी… काय डोंगर… काय हाटील फेम सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात झाला असून यामध्ये एक जण जागीच […]
सोलापूर : युवा सेना नेते आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) ताफ्यावर औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान दगडफेक झाली. खरे तर डीजेचा कारण नाही, या हल्ल्याच्या पाठीमागे गद्दार, भाजप, शिंदे गट, (Shinde group) मिंदे गट या लोकांनी हा एकदम हल्ला करण्याचा षडयंत्र सुरू केलं आहे. आदित्य ठाकरेंच्या संरक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यावर देखील शंका आहे, कारण हे अधिकारी देखील सध्या […]
पुणे : कसबा मतदारसंघातील (kasba bypoll) काँग्रेस (Congress) पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या फोनची जोरदार चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांची केलेली मनधरणी आणि त्यानंतर खुद्द राहुल गांधी यांनी त्यांना फोन करत पक्षासाठी त्याग करण्याचे केलेले आवाहन अन् त्यानंतर दाभेरकर यांनी […]
मुंबई : काँग्रेसमधील ज्या नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केली त्या नेत्यांची यादी तयारच असल्याचा बॉम्ब काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांनी टाकला आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षात अती लोकशाही असल्यानेच गटबाजी झाल्याचं रोखठोक मत हंडोरे यांनी व्यक्त केलंय. हंडोरे यांनी लेट्सअशी संवाद साधला आहे. त्यावेळी ते बोलत होते. हंडोरे (Chandrakant Handore )म्हणाले, काँग्रेसमध्ये असलेले नेते […]