मान्सून उशिरा येतोय… यंदा लवकर पेरणी टाळाच!

मान्सून उशिरा येतोय… यंदा लवकर पेरणी टाळाच!

Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह महाराष्ट्रात दिसून येत आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biparjoy Update) वेग मंदावला आहे. मागील तीन दिवसांपासून चक्रीवादळाची अधिक हालचाल झालेली नाही. या चक्रीवादळाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी शेतकऱ्यांना पेरणी संदर्भात महत्वाचा सल्ला दिला आहे.

माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे की ‘बिपरजॉय’ चक्रीवादळच्या सध्याच्या होत असलेल्या मार्गक्रमणामुळे आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे 16 जूनपर्यंत मुंबई सह ठाणे, पालघर, डहाणू, तलासरी, मोखाडा तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा व संपूर्ण खान्देश भागात ढगाळ वातावरणासह ताशी 35 ते 40 कि.मी. वेगवान वाऱ्यासह किरकोळ ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

नैऋत्य मान्सूनच्या मार्गक्रमणासाठी वातावरण अनुकूल आहे. पण कमकुवतपणामुळे नैऋत्य मान्सून पुढे मार्गस्थ होत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरच असलेल्या मान्सूनमध्ये गेल्या 4 दिवसांपासून प्रगती होत नाही. कदाचित 18 ते 21 जून दरम्यानच मान्सून पुढे सरसावण्याची हालचाल होईल, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

WTC 2023-25: भारतीय संघाचे वेळापत्रक जाहीर, या संघांशी होणार सामने, जाणून घ्या…

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी कोणताही सकारात्मक परिणाम झालेला नाही. विदर्भात आजपासून पुढील 5 दिवस म्हणजे 19 जूनपर्यंत उष्णतेची लाटसदृश स्थिती जाणवेल, असे खुळे यांनी सांगितले आहे. ‘एल-निनो’च्या भाकितानुसार मान्सून काळ 15 जुलैनंतर विकसनाची शक्यता होती परंतु आताच मान्सून विकसित झाल्याचे ‘नोआ ‘ या संस्थेने सांगितले. म्हणजेच 15 जुलैपर्यंत 25-30 दिवसात अपेक्षित कोसळू शकणाऱ्या मान्सूनच्या आशा देखील आता मावळते की काय असे वाटू लागले. जून महिन्यातील सरासरीपेक्षा कमी पावसाच्या भाकीत खरे ठरले आहे. अर्धा महिना संपला तरी देखील महाराष्ट्रातील पावसाची तुट 50% पेक्षा अधिक आहे, असे खुळे यांनी सांगितले.

राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क

गेल्या फेब्रुवारीपासून एल-निनोचा इशारा देण्यात येत आहे. परंतु मागील 3 वर्षात निनामुळे भरपूर पाऊस झाला होता. त्यामुळे जमिनीत भरपूर पाणीसाठा आहे. त्या पाणीसाठ्यावर शेतकरी अवलंबून होते. आता शेतकरी पेरणी योग्य पाऊस कधी होईल? असा सवाल करत आहेत. 20 जूनच्या आसपास मोसमी पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे, असे खुळे यांनी सांगितले आहे. जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यात (23-30 जून) पेरणी योग्य पावसाची शक्यता आहे. पूर्ण 8 इंच ओलीवरच पेरणी केली पाहिजे. तोपर्यंत वाट बघा, लक्ष ठेवा पण ह्यावर्षी घाईतली पेरणी टाळाच, असे अवाहन माणिकराव खुळे यांनी केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube