मुंबई : राज्यात आजपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. राज्यभरातून सुमारे 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. त्यानुसार, आजपासून पोलीस भरतीच्या शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली […]
नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर जवळ मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या कार, रिक्षा आणि स्कूटी अशा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातामध्ये स्कुटी आणि रिक्षाचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं. या भीषण अपघातात शहापूर तालुक्यातील कवडास येथील तरुणी अश्विनी गोळे हीचा जागीच मृत्यू झालाय. तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रिक्षामधील आणखी तीन जण गंभीर जखमी […]
मुंबई : अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने आज सोमवार, २ जानेवारीपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे नव्या वर्षात आरोग्यसेवा कोलमडण्याचा धोका निर्माण झाला आहे. संप अशा काळात पुकारण्यात आला जेव्हा पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दरम्यान ही स्थिती टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने […]
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात झालेल्या भीषण आगीत दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मृत महिलांच्या वारसांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. तर जखमींवर योग्य उपचार होतील, त्याचबरोबर जखमींची सर्व खर्च सरकार करेल असे आश्वासन […]
औरंगाबाद : कृषी महोत्सवात कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिकांची लागवड आणि तंत्रज्ञानापासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही चर्चासत्रे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. औरंगाबादेतील सिल्लोड इथे आज राज्यस्तरीय कृषी महोत्सव उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिकच्या दुर्घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी स्टॉलला भेट […]
औरंगाबाद : सर्वच नेते मलाच का टार्गेट करतात, असा सवाल राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना केला आहे. औरंगाबादेतील सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मी आज सत्तेत आहे, मी कोणावर टीका-टीपणी करत नाही. सत्तेत असताना कोणावर टीका टीपणी करणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच मी एक […]