सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला करणारे भारतीय जनता पक्षाच्या ट्रेनिंग स्कूलचेच लोक, राऊतांचा थेट वार
आम्हाला भूषण गवई हे आशेचे किरण दिसत आहेत. गेल्या 10 वर्षात भारतीय न्यायव्यवस्थेचे पूर्ण धिंडवडे मोदी आणि शाहांनी काढले आहेत.

देशात गेल्या 10 वर्षात जे विष कालवले गेले ते धर्मांधता, अंधभक्तीचे त्यातून असे माथेफिरू निर्माण झाले. (Raut) देशाच्या न्यायव्यवस्थेविषयी आदर बाळगावा असं वातावरण नाही. न्यायव्यवस्थेला जोडे मारावे अशी परिस्थिती आहे असा थेट हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या कामाशिवायी देशाला आदर आहे. आम्हाला भूषण गवई हे आशेचे किरण दिसत आहेत. गेल्या 10 वर्षात भारतीय न्यायव्यवस्थेचे पूर्ण धिंडवडे मोदी आणि शाहांनी काढले आहेत. त्यामुळे भूषण गवई यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ल्याचा प्रयत्न करणारे हे भारतीय जनता पक्षाच्या ट्रेनिंग स्कूलचेच लोक आहेत, सनातनी म्हणून घेणारे.
विष्णुचा अवतार नक्की कोण? आणि त्याला का राग आला? नरेंद्र मोदी हे विष्णुचे 13 वे अवतार आहेत, त्यामुळे त्याला राग आला का? असं ते म्हणतात की, सरन्यायाधिशांनी टिप्पणी केली, त्यामुळे त्यांना राग आला. अशी बिनडोक आणि हिंदुत्वाला कलंक लावणारी ही लोक आहेत. हे खरे हिंदू नाहीत. ज्याने सनातनच्या नावाखाली हल्ला केला, त्याने भारताच्या संविधानावर हल्ला केला.
कुणाचीही माफी मागणार नाही; सरन्यायाधीश गवईंना बूट दाखवणाऱ्या राकेश किशोरचा मुजोरपणा कायम
भारतातील सरन्यायाधिश पदावरील व्यक्तीवर हा हल्ला झाला. भारताच्या आत्मावर हल्ला केला. ज्यांच्याविषयी या देशाला प्रचंड आदर आहे. त्यांना जो कमी कालावधी मिळाला, त्यांना यापेक्षा जास्त मिळायला हवा होता, अशी भावना लोकांची आहे, म्हणजे विचार करा किती जास्त आदर आहे. अशा व्यक्तीवर बूट फेकून स्वत:ला सनातनी जाहिर करणं हे या देशाच्या प्रतिष्ठेचे धिंदवडे भारतीय जनता पक्षाने काढले आहेत.
अंधभक्तांना कधी पश्चाताप होत नाही. आपली न्यायव्यवस्था प्रतिष्ठा गमावून बसली आहे, ती यामुळे…शिवसेना गेली तीन वर्ष न्यायासाठी झगडत आहे. कायदेशीर लढाई लढत आहे पण आम्हाला तारीख पे तारीख मिळत आहे. आम्हाला न्याय मिळेल, आशा आज पण आम्हाला आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी अशी चर्चा झाली नाहीये, असेही संजय राऊत यांनी म्हटले.