पीएम शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता थकला; खातं अपडेटच्या नावाखाली फसवणूक, अशी घ्या काळजी

पीएम शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता थकला; खातं अपडेटच्या नावाखाली फसवणूक, अशी घ्या काळजी

PM-Kisan Samman Nidhi : आणखी जुन महिन्याच्या पंतप्रधान (PM) सन्मान निधीचा हफ्ता बऱ्याच शेतकऱ्यांचा जमा झाला नाही. केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. (PM-Kisan) प्रत्येक चार महिन्यांनी तीन हफ्त्यांत ही रक्कम दिली जाते. मात्र, या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. खाते अपडेट करा म्हणुन एका लिंकचा मॅसेज येतो आणि शेतकऱ्यांचे बँकेचं खातंच रिकामं होत असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी घडला आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक  खासदार ओमराजे निंबाळकरांनी सभागृह गाजवलं; प्रधानमंत्री पीक विमा योजना नक्की कुणासाठी?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातून पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाील आपलं खातं अपडेट करा, आपला पंतप्रधान सन्मान निधी जमा झाला का चेक करा, तुमचा अडकलेला हफ्ता, मिळवा, तुमचा हफ्ता आत्ताच मिळावा, कोण कोण घेऊ शकतो योजनेचा लाभ, आता किसान सन्मान निधी पोर्टल उपलब्ध अशा एक ना अनेक प्रकारच्या मॅसेजमधून अशी एक एपीके लिंक व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लीक केल्यावर शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचं उघड झालं आहे. शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही लिकंवर क्लीक करू नये,असं आवाहन पोलीस प्रशासनही करत आहे.

१९३० या हेल्पलाईन मला कुणी विरोधक नाही; असं का म्हणाले नगरचे खासदार? पाहा लेट्सअप मराठीवर बेधड निलेश लंके

ही एका प्रकारची सायबर फसवणूक आहे. तुम्ही या लिंकवर क्लीक केल्यानंतर मोबाईल फोनमध्ये एक अॅप्लिकेशन डाऊनलोड होते. त्यानंतर शेतकऱ्यांचा मोबाईल आणि सीमकार्ड हॅक होतं. मोबाईल आणि सीमकार्डचा कंट्रोल घेतला जातो. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही लिंकवर क्लीक कर नये. अन्यथा शेतकऱ्यांचे बँक खाते रिकामे होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते. अशा प्रकारे आपली फसवणूक झाली असेल तर तात्काळ बँकेला अथवा १९३० या हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा व त्यासोबतच cybercrime.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तक्रार दाखल करावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube