“चहावाल्याला विचारत होते पण आम्ही फिनटेक क्रांती घडवलीच”; PM मोदींचा विरोधकांना टोला
Global FinTech Fest : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्रात आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टला (Global Fintech Fest) मोदींनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी फिनटेक क्रांतीवर संशय घेणाऱ्या विरोधकांवर खोचक (Maharashtra) टीका केली. ज्यावेळी सरस्वती देवी बुद्धी वाटत होती त्यावेळी हे लोक रस्त्यातच राहिले. आता देशात सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. जन्माष्टमीही उत्साहात साजरी झाली. लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था आणि मार्केटमध्येही दिसून येत आहे.
मुंबई शहरात (Mumbai News) ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल होत आहे. एक वेळ अशी होती जेव्हा विदेशी लोक भारतात यायचे आणि येथील सांस्कृतिक विविधता पाहून थक्क व्हायचे. आताही विदेशी लोक भारतात येतात आणि येथील फिनटेक विविधता पाहून थक्क होतात. मागील दहा वर्षांच्या काळात फिनटेक क्षेत्रात 31 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे.
India’s FinTech revolution is improving financial inclusion as well as driving innovation. Addressing the Global FinTech Fest in Mumbai.https://t.co/G0Tuf6WAPw
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2024
भारतात स्वस्त मोबाइल फोन, डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन खात्यांचा उल्लेख करत मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले, तुम्हाला आठवत असेल की काही लोक संसदेत नेहमी प्रश्न विचारत होते. स्वतःला अति बुद्धीमान समजणारे लोक प्रश्न विचारत होते. सरस्वती देवी ज्यावेळी बुद्धी वाटत होती तेव्हा बहुधा हे लोक रस्त्यात सर्वात आधी उभे होते. त्यांच्याकडून असं म्हटलं जायचं की भारतात इतक्या बँका, इंटरनेट नाही. इतकंच काय तर भारतात वीजही नाही अशी हेटाळणी या लोकांकडून केली जात होती.
मोहन भागवत यांच्या सुरक्षेचे कडे आणखी अभेद्य : PM मोदी अन् अमित शाहंनंतर बनले तिसरे व्यक्ती
फिनटेक क्रांती कशी होणार असाही सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात होता. माझ्यासारख्या चहावाल्याला विचारलं जात होतं. पण आज तुम्ही पाहत आहात एका दशकाच्या काळातच भारतात ब्रॉडबँड युजर्सची संख्या सहा कोटींवरून थेट 94 कोटी झाली आहे. आज आधारकार्ड नाही असा भारतीय व्यक्ती क्वचितच सापडेल. आज 53 कोटींपेक्षा जास्त लोकांचे जनधन खाते आहेत. दहा वर्षात युरोपियन यूनियनच्या लोकसंख्येइतक्या लोकांना आपण बँकिंग सिस्टिमशी जोडल्याचे मोदी म्हणाले.
सायबर फसवणुकीचे प्रकार रोखले
सायबर फसवणुकीच्या प्रकारांना आम्ही आळा घालण्याचं काम केलं. बँकिंग क्षेत्राला अगदी गावखेड्यात घेऊन गेलो. आज शेकडो अशा सरकारी योजना आहेत ज्यांचा फायदा डिजिटल रुपात देशातील जनतेला मिळत आहे. कोरोना संकटाच्या काळातही आपलं बँकिंग सिस्टिम बंद पडली नाही. करेंसीपासून क्यू आर कोड पर्यंतचा प्रवास पार करण्यात बराच काळ गेला पण आज आपण रोजच नवनवीन गोष्टी पाहत आहोत.