नगरपालिकेप्रमाणे महानगरपालिकेत देखील काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचा खा. धानोरकर यांनी व्यक्त केला विश्वास
नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत जनतेने काँग्रेसचे 7 नगराध्यक्ष निवडून दिले. चंद्रपूर महापालिकेत देखील आम्हीच निवडून येऊ.
Press conference of Chandrapur MP Pratibha Dhanorkar : चंद्रपूरमधील काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर(Pratibha Dhanorkar) यांनी आज चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत जनतेने काँग्रेसचे 7 नगराध्यक्ष निवडून दिले आहेत. चंद्रपूर(Chandrapur) महापालिका निवडणुकीविषयी देखील आमची चर्चा झाली असून तिथे देखील आम्हीच निवडून येऊ असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantivaar) यांच्यावर देखील भाष्य केले.
चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असून देखील तिथे भाजप निवडून येऊ शकली नाही. महापालिका निवडणुकीत पण असंच काहीसं चित्र असेल, तिथे देखील काँग्रेसचं निवडून येईल. जो माणूस पक्ष सोडून जाणार आहे, त्याच पक्षाचा होणार नाही हे त्यांना आवडणार नाही. येणाऱ्यांना मी थांबवणार नाही, काँग्रेसची जिल्ह्यातील टाकद महापालिका निवडणुकीत दिसून येईल. माझ्यात आणि विजय मराठीवर यांच्यात मतभेद असले तरी पक्षाचा विषय समोर ठेऊन आम्ही पक्षांतर्गत वाद ठेवणार नाही. नगरपालिका निवडणुकीत आम्ही चांगलं यश मिळवलं. आता महापालिका निवडणुकीत देखील एकत्र येऊन सर्वांना विश्वासात घेऊन महापालिकेत निवडून येऊ.
राम शिंदेंसाठी थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी कायदाच बदलला; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
पत्रकार परिषेदेत त्यांनी नवनीत राणा यांच्यावर देखील भाष्य केले. नवनीत राणा यांनी काल एक वक्तव्य केलं होत. त्याला त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. चार-चार मुलं जन्माला घालून त्यांचं पालन पोषण करू शकतो का? कोण काय वक्तव्य करतात, आपलं कुटुंब कसं सांभाळता येईल ते पहिले पाहिलं पाहिजे. तसाच भाजपवर त्यांनी टीका केली आहे. निवडणूक आली की, अंतर्गत वाद अस्तरात, नाराजी समोर येते या सगळ्यांचा फायदा आम्हाला होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर देखील त्यांनी बोट ठेवलं. माझ्या क्षेत्रातील नगरपालिका आम्ही वंचितला सोबत घेऊन लढवल्या. त्याचप्रमाणे आगामी महापालिका निवडणुकीतही त्यांना आम्ही सोबत घेऊन लढण्याचा प्रयत्न करू. यावर आमचे वरिष्ठ निर्णय घेतील. प्रकाश आंबेडकर यांना काय बोललं पाहिजे. 2012 मध्ये महापालिकेची स्थापना झाली तेव्हा काँग्रेसचा महापौर होता. नंतर आता भाजपचा झाला. आणि यावर्षी 100 टक्के महापौर हा काँग्रेसचाच होईल.
