Malegaon Blast : ‘एनआयएने पुरावेच सादर केले नाही…’; पृथ्वीराज चव्हाणांचे केंद्रीय तपास यंत्रणावर प्रश्नचिन्ह

Malegaon Blast : ‘एनआयएने पुरावेच सादर केले नाही…’; पृथ्वीराज चव्हाणांचे केंद्रीय तपास यंत्रणावर प्रश्नचिन्ह

Prithviraj Chavan on Malegaon Blast case : मालेगाव बॉम्बस्फो (Malegaon Blast) प्रकरणात सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले आहे. या निकालानंतर कॉंग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. एनआयएने (NIA) कोर्टात पुरावेच सादर केले नाहीत, पुरावे सादर होत नसतील तर हे सरकारचं अपयश आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.

दादा, भाऊ अन् तटकरेंच्या बैठकीनंतर कोकाटेंकडून ‘ओसाड गावची पाटीलकी’ काढून घेतली जाणार? 

एनआयएला पुरावे सादर करण्यात अपयश
पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाविषयी विचारले असता ते म्हणाले की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर कोर्टाने निकाल दिलाय, पण या प्रकरणात एनआयएला पुरावे सादर करण्यात अपयश आलं. मोटार सायकल एका व्यक्तीची होती हे सिद्ध झाले होते, मात्र अंतिम पातळीवर पुरावे सादर झाले नाहीत. एनआयए कोर्टात पुरावे सादर करत असते, पण एनआयला पुरावे सादर करण्यात अपयश आलं. कारण, ही संस्था गृह मंत्रालयाच्या अखत्यरित काम करते म्हणजे अमित शाहांच्या यांच्या नेतृत्वाखाली काम करते. शाह यांच्या नेतृत्वाखाली जो पर्यंत या यंत्रणा काम करतात तोपर्यंत असे निकाल लागणार, असंही ते म्हणाले.

आरोपी सुटले हे सरकारचं अपयश…
पुढं चव्हाण म्हणाले की, बारा वर्षे एनआयएला पुरावे सापडले नाही असं नाही, तर त्यांनी पुरावे सादर केले नाहीत आणि ही गंभीर बाब आहे. यापूर्वी राज्य सरकारच्या एटीएसने या बॉम्बस्फोटाबद्दल १७ लोकांविरूद्ध, पुढं आणखी ७ जणांवर चार्जशीट दाखल केली होती. महाराष्ट्र पोलीस इन्कॉम्पिटेंट होते का, त्यांनी खोट्या केसेस रचल्या का? य़ावर गृहमंत्री फडणवीसांनी बोललं पाहिजे, असंही चव्हाण म्हणाले. कोर्टात पुरावा सादर न झाल्याने किंवा प्रॉसिक्यूशन नीट न झाल्याने हे आरोपी सुटले आहेत, हे सरकारचं अपयश आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

तामिळनाडूत भाजपला दणका! CM स्टॅलिनची भेट अन् पन्नीरसेल्वम NDA तून बाहेर; काय घडलं? 

पुढं बोलताना चव्हाण म्हणाले, कृपा करून भगव्या रंगाचा वापर दहशतवादासाठी करू नका. भगवा शब्द वापरू नका. भगवा हा आमच्यासाठी एक राष्ट्रभक्तीचा रंग आहे. भगवा रंग संत ज्ञानेश्वर, वारकरी, संत तुकाराम, छत्रपती शिवरायांचा आहे. तो हिंदुत्व किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा रंग नाही, असंही ते म्हणाले. स्वतंत्र भारतात नथुराम गोडसेकडून पहिली दहशतवादी घटना घडली. नक्षली लोकांकडून दहशतवादी घटना घडतात. दहशतवाद्याला कोणताही धर्म, जात अन् पंथ नसतो. तो गुन्हेगार आणि खुनी असतो, त्याला शिक्षा झाली पाहिजे, असं चव्हाण म्हणाले. पण, आज एका मागोमाग एक आरोपी सुटत असतील तर हे गृहमंत्र्यांच्या अखत्यारितील यंत्रणांचं अपयश आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.

बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनी निकाल जाहीर
२००८ च्या मालेगाव शहरातील बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनी आज (३१ जुलै) एनआयए विशेष न्यायालयाकडू निकाल जाहीर झाला. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता आणि १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या खटल्यातील प्रमुख आरोपींमध्ये भाजप नेत्या आणि माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर पाच जणांचा समावेश होता. आज या सर्वांना कोर्टाने निर्दोष सोडलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube