दादा, भाऊ अन् तटकरेंच्या बैठकीनंतर कोकाटेंकडून ‘ओसाड गावची पाटीलकी’ काढून घेतली जाणार

दादा, भाऊ अन् तटकरेंच्या बैठकीनंतर कोकाटेंकडून ‘ओसाड गावची पाटीलकी’ काढून घेतली जाणार

Maharashtra Politics : माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधानं सातत्याने होत (Manikrao Kokate) असतानाच विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे (Maharashtra Politics) महायुती सरकारची मोठी कोंडी झाली होती. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अजित पवार यांनी मात्र कोकाटे यांच्याशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट देखील घेतली होती.

या बैठकीत अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या बैठकीत चर्चा होऊन कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांच्या खात्यात बदल करण्यात येईल अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे. आज संध्याकाळपर्यंत हा सगळा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सभागृहात तब्बल 22 मिनिटं रम्मी खेळले, रोहित पवारांचा दावा, कोकाटेंचा चौकशी अहवाल?

मंत्री दत्ता भरणे आणि मकरंद पाटील या दोन मंत्र्यांकडे असलेली खाती कोकाटे यांना दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याची जबाबदारी दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील या दोघांपैकी एकाला मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यावरुन स्पष्ट होत आहे की विरोधकांच्या दबावाला बळी न पडता कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. फक्त त्यांच्याकडील खाते काढून त्यांना दुसरे खात्याची जबाबदारी दिली जाणार आहे.

धनंजय मुंडेंना संधी मिळणार का?

दरम्यान, धनंजय मुंडे देखील कृषी खात्यासाठी उत्सुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंडेंना पु्न्हा मंत्रिमंडळात घेतलं जाईल का असा प्रश्न सातत्याने चर्चेत आहे. धनंजय मुंडे यांच्यावर सध्या अनेकांकडून आरोप होत आहेत. काल भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मुंडे यांना कृषीशी निगडीत खरेदी या एकाच प्रकरणात दिलासा मिळालेला आहे. धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्या काळात भ्रष्टाचार झालेला आहे.

सत्ताधारी पक्षातीलच आमदार त्यांच्यावर आरोप करत आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही धस यांनी दिला आहे. त्यामुळे मुंडेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे. काल सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंडेंनी घेतली होती. तब्बल अर्धा तासांची ही भेट होती. ही काही राजकीय भेट नव्हती. परळी मतदारसंघातील विविध विकासकामांची यादी घेऊन मुंडे यांनी भेट घेतल्याचे नंतर सांगण्यात आले. त्यानंतर आजही अजित पवार यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीतून मंत्रिपदाची चर्चा झाली का याची माहिती अजून तरी मिळालेली नाही.

कोकाटेंना आम्ही मंत्रिपद दिलं नव्हतं, पण देवेंद्रजी सुसंस्कृत.. कोकाटेंच्या राजीनाम्याहून सुप्रिया सुळेंचा टोला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube