मोठी बातमी : ‘राज’ खेळीनं वार फिरणार! विधानसभेसाठी मनसेकडून नांदगावकर, धोत्रेंना उमेदवारी जाहीर
Raj Thackeray Declared Two Candidate Name For Upcoming Vidhansabha Election : आगामी विधानसभेसाठी राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणुका लढण्याचं भाष्य करणाऱ्या राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मोठी घोषणा केली आहे. एकीकडे मविआ आणि महायुतीत जागावाटपांच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतानाच राज ठाकरेंनी विधानसभेसाठी शिलेदार मैदानात उतरवण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (दि.5) मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना शिवडीतून तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: याबद्दलची घोषणा केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. त्यानंतर आता मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
…त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही; असं का म्हणाले राज ठाकरे? काय आहे त्यांची योजना?
शिवडी जिंकण्यासाठी हुकमी एक्का मैदानात
राज ठाकरेंनी दक्षिण मुंबईतील अतिशय महत्त्वाचा असणारा शिवडी मतदारसंघ काबीज करण्यासाठी हुकमी एक्का मैदानात उतरवला आहे. या मतदारसंघातून मनसेकडून राज यांचा हुकमी एका म्हणून ओळख असलेल्या बाळा नांदगावकर यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. सध्या या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या पहिल्या २ उमेदवरांची घोषणा.#MNSAdhikrut #Vidhansabha2024 pic.twitter.com/ci4hO7IWBV
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 5, 2024
2014-2019 मध्ये चौधरींनी मारली होती बाजी
अजय चौधरी हे 2014 आणि 2019 असे दोनवेळा निवडून आले आहेत. 2014 मध्ये अजय चौधरींनी नांदगावकरांचा तर, 2019 मध्ये अजय चौधरी यांनी मनसेच्याच संतोष नलावडेंचा पराभव केला आहे. त्यामुळे यावेळी चौधरी हॅटट्रिक करणार की राज ठाकरेंचे शिलेदार नांदगावकर बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज ठाकरेंचा शिलेदार अडकणार? शिंदे अन् ठाकरेंची तगडी फिल्डिंग…
शिक्षण दहावीपर्यंत मात्र जबाबदाऱ्या महत्त्वाच्या
एकेकाळी बाळा नांदगावकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते. त्यावेळी त्यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख होती. मात्र, त्यानंतर त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत मनसेचा झेंडा हाती घेतला. उद्धव ठाकरेंसोबत असताना नांदगावकर मांझगाव मतदारसंघातून 1995 ते 2004 असे सगल तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, 2009 मध्ये नांदगांवकर मनसेच्या तिकीटावरून शिवडी विधानसभेच्या मैदानात उतरत आमदार झाल होते. नांदगावकर यांनी आतापर्यंत मनसेमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.