..म्हणून ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढणार नाही; कारण सांगत राजू शेट्टी स्वबळावर ठाम

..म्हणून ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढणार नाही; कारण सांगत राजू शेट्टी स्वबळावर ठाम

Raju Shetti : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने काल चार उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना तिकीट दिले. या मतदारसंघातून आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी निवडणूक (Raju Shetti) लढवतील अशी चर्चा होती. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी अनेकदा चर्चाही केली होती. मात्र, राजू शेट्टींच्या अटी आम्हाला मान्य झाल्या नाहीत असे सांगत सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर आता राजू शेट्टी यांनीही मशाल चिन्हावर निवडणूक लढण्यास आपण का तयार झालो नाही, याचं कारण सांगितलं.

Raju Shetti : कृषीमंत्र्यांनी लक्षात ठेवावं ते बीडचे कृषीमंत्री नाहीत; राजू शेट्टीचा मुंडेंना टोला

राजू शेट्टी म्हणाले, संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या काही बैठकांत आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही मागील तीन वर्षांपासून निवडणूक लढण्याची तयारी केली होती. भाजपविरोधात मतांची विभागणी टाळण्यासाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा असे मत काही सदस्यांचे होते. तर दुसरीकडे ही जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडणार असे महाविकास आघाडीचे नेते सांगत होते. या मतदारसंघात उमेदवार देऊ नका अशी मागणी करत मी दोन वेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असेही ठरले होते.

परंतु, पुढे काय झाले माहिती नाही. मला सांगण्यात आले की मशाल चिन्हावर निवडणूल लढा. परंतु, मशाल चिन्ह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे. आता हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवणे म्हणजे शिवसेनेत प्रवेश केल्यासारखंच होतं. मी आजपर्यंत कधीच कोणत्याही राजकीय पक्षात काम केलेलं नाही. निवडणूक लढता यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली होती. याआधी अनेक निवडणुका लढल्या.

परंतु, आता व्यक्तिगत स्वार्थासाठी शेतकरी आणि संघटनेला वाऱ्यावर सोडू शकत नाही. मशाल चिन्हावर निवडणूक लढू शकत नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांना कळवली होती, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता जरी त्यांनी हातकणंगलेतून उमेदवार जाहीर केला असला तरी आम्ही स्वतंंत्रच निवडणूक लढणार आहोत.

इथेनॉल निर्मितीवरील बंदीमुळे राजू शेट्टी आक्रमक; शेलक्या शब्दात सरकावर बरसले 

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज