राष्ट्रवादीतील धुसफुस चव्हाट्यावर? बंद दाराआडच्या बैठकीत भुजबळांनी पार्थ पवारांना सुनावल्याची चर्चा

Bhujbal taunted Parth Pawar भुजबळांनी एका टेंडरवरून थेट पार्थ पवारांना खडेबोल सुनावल्याचं एका बैठकीमध्ये घडल्याचं सुत्रांनी सांगितलं

Bhujbal Taunted Parth Pawar

Rumors swirling within NCP Rumors that Bhujbal taunted Parth Pawar in closed-door meeting : गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये पटेल-तटकरे आणि त्यांच्या फळीतील नेते विरूद्ध पार्थ पवार असा संघर्ष असल्याच्या अनेक गोष्टी वारंवार समोर येत आहेत. त्यात आता तर थेट भुजबळांनी एका टेंडरवरून थेट पार्थ पवारांना खडेबोल सुनावल्याचं एका बैठकीमध्ये घडलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये सुरू असलेली धुसफुस थेट वादामध्ये रूपांतरित झाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

छगन भुजबळ यांच्याकडे असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागामध्ये कोट्यवधी रुपयांच्या अन्नधान्य पुरवठा टेंडरची प्रक्रिया सुरू आहे. मात्र हे टेंडर एका विशिष्ट व्यक्तीला किंवा संस्थेला मिळावे यासाठी पार्थ पवार आग्रही होते. त्यामुळे यासाठी एक बैठक पार पडली. मात्र या बैठकीमध्येच एकीकडे तरुण नेते पार्थ पवार आणि दुसरीकडे जेष्ठ नेते आणि मंत्री असलेले छगन भुजबळ यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे.

Exclusive : मला दवाखान्यात न्या हो..फुगेवाडीत 9 जणांचा मृत्यू .. प्रकृती बिघडलेल्या तरुणाची आर्त हाक

छगन भुजबळ मंत्री असलेल्या विभागामध्ये थेट पार पवारांनी हस्तक्षेप केल्यामुळे भुजबळ यांचा संयम यावेळी सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या बैठकीमध्ये भुजबळांनी अत्यंत आक्रमक पवित्रा येथे थेट पार्क पवारांना खडेबोल सुनावले ते म्हणाले की, शासकीय नियमाने टेंडरची प्रक्रिया कशी चालते याचा मला दीर्घ अनुभव आहे त्यामुळे त्यामध्ये हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

14 मृत्यूंनी राज्य हादरलं; पुणे विषारी दारू प्रकरणात मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंहला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दुसरीकडे यावर भुजबळ आणि पार्थ पवार यांच्या देखील प्रतिक्रियाा आल्या आहेत. मात्र त्यांनी दोघांनी देखील असा वाद झाल्याचं फेटाळलं आहे. यावर भुजबळ म्हणाले की, आमच्या दोघांमध्ये कोणताही वाद झालेला नाही. तसेच टेंडर कोर्टात अडकलेले आहे. मंत्रिमंडळाला त्याला मंजुरी दिली आहे. टेंडर काढण्याची ऑनलाइन प्रक्रिया असते. त्यातून जे पात्र असतील त्यांना ते दिले जातं. ते कुणालाही देता येणार नाही. तसेच काही गोष्टी समजुतीने करायचे असतात. आमच्यात वाद झाला असा त्याचा अर्थ होत नाही.

100-101 चा त्रास संपला, देशभरात आता एकच आपत्कालीन हेल्पलाइन नंबर; SC चे महत्त्वाचे आदेश

तर यावर पार्थ पवार म्हणाले की, भुजबळ आणि माझ्यामध्ये वाद झाल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. आमच्यामध्ये असं काहीही झालं नाही, त्याचबरोबर मी कुठल्याही शासकीय कामांमध्ये हस्तक्षेप केलेल्या नाही.

follow us