शिंदेंनी नाही तर अमित शाहांनी शिवसेना फोडली; राऊतांचा खळबळजनक आरोप

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 06 10T105702.679

Sanjay Raut On Amit Shah :  भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाहांवर निशाणा साधला आहे. शिवसेना फोडण्याचे काम हे एकनाथ शिंदेंनी केले नसून अमित शाहांनी केले आहे. शिंदेंती ताकड ही तीन ते चार आमदारांच्या पलीकडे नव्हती, असे म्हणत त्यांनी शाहांवर हल्लाबोल केला आहे.

अमित शाहांनी शिवसेना फोडण्याचे काम केले. शिवसेना फोडून त्यांना महाराष्ट्र कमजोर करायचा आहे. मुंबईचा ताब्या घेण्यासाठी आणि मुंबईवरील मराठी माणसाचं वर्चस्व कमी करण्यासाठी शिवसेना फोडल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे.

भाई जगताप यांना हटवून वर्षा गायकवाड अध्यक्ष, जगताप यांची गच्छंती का?

शिवसेनेसारखा पक्ष फोडणं आणि शिवसेना फोडून महाराष्ट्र कमजोर करणे, मुंबईवर शिवसेनेची आणि मराठी माणसाची पकड ढिली करणं हे भाजपाचे गेल्या अनेक वर्षांपासूनच टास्क आहे. ते त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न जर साकार करायचे असेल तर शिवसेना फोडली पाहिजे हे त्यांच्या मनात होतं. पण शिवसेना फुटू शकत नाही हे त्यांना माहीत होतं. एकनाथ शिंदे यांच्यासह पाच-सहा लोकांना फोडण्याचा प्रयत्न सुरू होता. पण त्यांची ताकद पाच ते सहा आमदारांपेक्षा जास्त नव्हती. पण नंतर जे चित्र तयार झालं ते करण्यात भाजपचे दिल्लीचे नेतृत्व आघाडीवर होतं. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव करून हा पक्ष सोडण्यात आला असा दावा राऊतांनी केला आहे.

NCP चे संस्थापक सदस्य आता कुठे आहेत?

तसेच भाजपनेच आमच्याशी युती तोडली. भाजपने त्यांचं वचन निभावलं नाही. 2014 मध्ये भाजपने युती तोडली आम्ही तोडली नव्हती. युती तोडण्याचं स्वतः एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं होतं, तेव्हा खडसे भाजपमध्ये होते, असेही राऊतांनी सांगितले.

 

Tags

follow us