कालच्या सभेनंतर भाजपने गुप्त बैठक घेतली असेल; राऊतांचा खोचक टोला

कालच्या सभेनंतर भाजपने गुप्त बैठक घेतली असेल; राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut ON BJP :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीची काल मुंबईमध्ये वज्रमूठ सभा पार पडली. यावरुन देखील त्यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. कालच्या सभेला ऐक्याची वज्रमूठ दिसली. उद्धव ठाकरे यांच्यासह तिनही पक्षाचे नेते व्यासपीठावर होते.कालच्या सभेला मैदानात जेवढी गर्दी होती किंबहुना त्यापेक्षा अधिक गर्दी ही मैदानाच्या बाहेर होती, असे ते म्हणाले आहेत.

कालच्या सभेनं भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या पोटात गोळा येणं स्वाभाविक आहे. त्यांनी भितीही वाटली असेल. कालची आमची सभा बघून भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील व देशातील नेत्यांनी गुप्त बैठक घेतली असेल. त्यामध्ये मुंबई महानगर पालिकेच्या सभा 10 वर्ष घेऊ नयेत, असा एखादा ठराव मंजूर केला असेल. तुम्ही कितीही ठराव करा पण महाराष्ट्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तनाच्या दिशेने पाऊले पडत आहेत, असे राऊत म्हणाले आहेत.

Mohit Kamboj : राऊतांच्या ‘त्या’ आरोपांनंतर आज कंबोज पत्रकार परिषद घेणार

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल हे पूर्णपणे भारतीय जनता पक्ष व सरकारच्या विरोधात आहेत. काही विशिष्ट भाग वगळला तर सर्व ठिकाणी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या जागा आल्या आहेत. काही गद्दार आमदार हारलो तर मिश्या काढू असे  म्हणाले होते. आता त्यांनी मिश्या काढल्या आहे का ते बघा आणि नसेल तर आम्ही इकडून हजामत करायला न्हावी पाठवतो, असा टोला त्यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना लगावला आहे.

Sharad Pawar : आज‘लोक माझे सांगाती’चा पार्ट 2 येणार; काय नवे खुलासे समोर येणार? उत्सुकता शिगेला

तसेच बारसू रिफायनरी विरोधात जे आंदोलन सुरु आहे, त्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. येत्या 6 तारखेला उद्धव ठाकरे हे बारसू येथे जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत. स्थानिक लोक त्यांचं उत्साहाने स्वागत करतील. महाडला देखील त्यांची मोठी सभा होणार आहे, असे ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube