‘फडणवीस सगळ्यांच्या संपर्कात’; राऊतांच्या विधानाने शिंदे गटात खळबळ

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T105642.879

Sanjay Raut On Devendra Fadanvis :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी काल ठाकरे गटावर टीका करताना पोपट मेला आहे, हे त्यांना माहित आहे. तरी देखील ते पोपटाचा हात व पाय हाय हालवून पाहत आहेत, अशी टीका केली होती. यावर राऊतांनी उत्तर दिले आहे.

या अख्ख्या सरकारमध्ये जर कोणी शहाणा माणून असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. बाकी सगळे अतिशहाणे किंवा मूर्ख आहेत. पण देवेंद्र फडणवीसच जर असं बोलायला लागले असतील तर शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच त्यांना वकिलींच चांगल ज्ञान आहे, त्यांना कायदा कळतो, त्यांना प्रशासन कळतं, त्यांना राजकारण माहितीये, त्यांना पडद्यामागे काय चाललंय ते माहितये, ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत. तरी ते अशी वक्तव्ये करतात यावरुन त्यांची काहीतरी मजबुरी दिसते, असे राऊत म्हणाले आहेत.

फडणवीसांचा खास माणूस मतदारसंघात सक्रीय, BJP आमदाराची टीका, म्हणाले, ‘आम्ही तुम्हाला पुरून उरतो’

यावेळी राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर देखील भाष्य केले आहे. ते अनेक पक्षांतर केलेले नार्वेकर बोलत आहेत की विधानसभा अध्यक्ष बोलत आहेत?  नार्वेकर सुद्धा कायद्याचे जाणकार आहेत.  त्यांना जर दुर्योधनाच्या बाजूने उभा राहायचं असेल तर कायद्याची पदवी ही पेटीत बंद करावी, असे म्हणत त्यांनी नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. तसेच  न्याय नाकारणे यापेक्षा न्यायला विलंब करणे हे घटनाविरोधी आहे, असे ते म्हणाले आहेत.

Devendrs Fadanvis : ‘पोपट आता मेलाय…’ 16 आमदारांच्या अपात्रतेवर फडणवीसांचं मोठं विधान

Tags

follow us