राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी 7 दिवसाआधी शेवटचा प्रयत्न? शरद पवार गटाने प्रस्ताव दिला पण…
Sharad Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात
Sharad Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात सुरु आहे. यासाठी दोन्ही पक्षातील काही नेते पडद्यामागे काम देखील करत आहे मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस सध्यातरी एकत्र येताना दिसत नाही. तर दुसरीकडे आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी शरद पवार गटाकडून शरद पवार यांच्या राज्यसभेचा अर्ज भरण्याच्या सात दिवसांपूर्वी एक निर्णायक प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार गटातील एका बड्या नेत्याने अजित पवार गटासमोर प्रस्ताव ठेवला होता असं सांगण्यात येत आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांना संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) राज्यसभेसाठी उमेदवारी द्या आणि पार्थ पवारांचे (Parth Pawar) पुनवर्सन करा असा प्रस्तावा शरद पवार गटातील एका बड्या नेत्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे देण्यात आला होता मात्र या प्रस्तावावर अजित पवार गटाकडून कोणताही प्रतिक्रिया न आल्याने विलीनीकरणाची चर्चा थांबली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील (NCPSP) या बड्या नेत्याने केला आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी शरद पवार गटातील एका बड्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानुसार, संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांना उमेदवारी देण्यात यावी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात यावी असा प्रस्ताव देण्यात आला होता मात्र या प्रस्तावावर अजित पवार गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने विलीनीकरणाची चर्चा आता थांबली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
शरद पवारांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर
तर दुसरीकडे भविष्यात भाजपसोबत जाणार नाही या अटीवर शरद पवार यांना महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुरुवातीला या जागेसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून दावा करण्यात येत होता मात्र शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने दोन्ही पक्षांनी माघार घेत शरद पवार यांना उमेदवारी दिली.
इराण-अमेरिका युद्धाचा फटका, एलपीजी सिलिंडर महागलं; जाणून घ्या नवीन किंमत
राज्यातील 7 राज्यसभेच्या जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार होते मात्र ही निवडणूक आता बिनविरोध झाली आहे. आकडेवारीनुसार, 7 पैकी 6 जागा महायुतीला मिळणार आहे. महायुतीमध्ये भाजपला 4, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक- एक आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळणार आहे.
