शरद पवारांचं थेट PM मोदींना पत्र; ‘या’ कारणासाठी मानले आभार अन् विनंतीही केली

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं (PM Narendra Modi) आहे. पत्राचं कारणही समोर आलं आहे. खरंतर शरद पवार यांनी या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच एक विनंतीही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहिले म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांचे आभार मानल आहेत. याचबरोबर पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पूर्णाकृती अश्वारुढ पुतळे उभारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या द्या अशी विनंती पत्रातून केली आहे.
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटनाची विनंती मान्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक… pic.twitter.com/2qWCEmfBbx
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 15, 2025
शरद पवारांच्या पत्रात नेमकं काय?
फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याची माझी विनंती तुम्ही नम्रपणे स्वीकारली याबद्दल मी मनापासून आभारी आहे. तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना भावले. उद्घाटन समारंभात माझ्याबद्दल तुमच्या विशेष प्रेमाचे प्रदर्शन करणाऱ्या तुमच्या दयाळू कृत्याबद्दल मी तुमचे खरोखर आभार मानतो.
जयंत पाटील पक्षात नाराज? शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट, त्यांनी बारामतीतच
नवी दिल्ली तालकटोरा स्टेडियम म्हणजे प्रचंड ऐतिहासिक आणि सांस्कृति महत्वाचे ठिकाण आहे. पेशवे बाजीराव पहिले, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हाराव होळकर यांनी येथे तळ ठोकला होता. हीच गोष्ट लक्षात घेऊन सरहद पुणे संस्थेने सुरुवातीला या महान योद्ध्यांच्या अर्धपुतळे या ठिकाणी उभारण्यात यावेत असा प्रस्ताव मांडला होता. परंतु, पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे त्यांच्या शौर्याला आणि योगदानाला योग्य ठरतील अशी भावना अनेक साहित्यिक आणि शुभचिंतकांनी व्यक्त केली होती.
आता या अश्वारूढ पुतळ्यांसाठी आवश्यक कार्यवाही नवी दिल्ली महापालिकेच्या अखत्यारित येते. त्यामुळे पुतळे या ठिकाणी बसवण्यासाठी आवश्क परवानग्या देण्यासाठी दिल्ली सरकार आणि एनडीएमसीला निर्देश देण्यासाठी मी तुमच्या हस्तक्षेपाची विनंती करतो असे शरद पवार यांनी या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना केली आहे.