“अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते…” तानाजी सावंत यांचा व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाड म्हणतात

  • Written By: Published:
“अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते…” तानाजी सावंत यांचा व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाड म्हणतात

सत्ता परिवर्तनाच्या मागे प्रमुख भूमिका तानाजी सावंत यांची होती हे आज महाराष्ट्राला कळलं. अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते आताची देत असलेली कारण खोटी आहेत हेच सिध्द होते. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर आमदारांचे काऊन्सिलिंग केल्यानंतर 100-150 बैठका घेतल्या, असं सांगितलं आहे. त्याच मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

 

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करून त्यात म्हटलं आहे की, आज सत्य समोर आलं. सत्ताबदलामध्ये तानाजी सावंत यांचे काम हे काऊन्सिलिंग आणि मिटिंगचे होते. त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर आमदारांचे काऊन्सिलिंग केल्यानंतर 100-150 बैठका घेतल्या. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर 100-150 बैठका घेतल्या. आमदारांच मतपरिवर्तन केलं आणि मग सत्ता परिवर्तन झालं. म्हणजे सत्ता परिवर्तनाच्या मागे प्रमुख भूमिका तानाजी सावंत यांची होती हे आज महाराष्ट्राला कळलं. अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते आताची देत असलेली कारण खोटी आहेत हेच सिध्द होते

काय म्हणाले होते तानाजी सावंत?

महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi)सत्तेत आल्यानंतर 2019 च्या पुढे सत्ता बदलायचं काम चालू होतं, आमदारांचं मतपरिवर्तनाचं काम आमचं चालू होतं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि माझ्या मिटींग होत होत्या. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्या जवळपास दोन वर्षात 100 ते 150 मिटींग झाल्या.

मराठवाडा, विदर्भातले आमदार असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील आमदार असतील त्यांचं मतपरिवर्तन करण्याचं काम सुरु होतं. हे सांगून करत होतं. झाकून करत नव्हतो, उघड माथ्यानं आपण करत होतो, असं ठणकावून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant)यांनी सांगितलं आहे. त्याचवेळी ते म्हणाले की, तुम्ही ऐकलं असेल की, मी जे बोलतो ते करुन दाखवतो. ते धाराशिव येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

जन्माची अद्दल घडविणार; अजितदादांच्या इशाऱ्यानंतर माजी आमदाराच्या पोटात गोळा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube