राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर; CM शिंदेच्या खास ‘म्होरक्या’ ने फोडला बॉम्ब

राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर; CM शिंदेच्या खास ‘म्होरक्या’ ने फोडला बॉम्ब

Maharashtra Political Crisis : आता राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याच्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार हे भाजपसोबत येतील याबाबत कल्पना होती का यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, कुणालाच कल्पना नव्हती, मात्र दोन महिन्यापूर्वीच तुम्हाला अंदाज सांगितलं होता, तो खरा ठरला अस मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं. ( Gulabrao Patil On Congress )

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, गेल्या वेळी मी नगर येथील सभेत सांगितल होत की विखे पाटील व त्यांचा मुलगा भाजपकडून निवडणूक लढेल आणि ते भाजपकडून निवडणूक लढले. त्यांनतर मी दोन महिन्यापासून सांगत होतो की अजित पवार आपल्याकडे येतील ते आले. आता काँग्रेस वाले येतील ते पण बघा, गुलाबरावांच्या दाव्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

क्रांतिकारी निर्णयाच्या दिशेनं नार्वेकरांचं पाऊल; शिंदे-ठाकरेंच्या 55 आमदारांची धाकधूक वाढली

याबाबत काँगेस आमदारांची काही चर्चा झाली आहे का, असं विचारल असता, काहीच चर्चा झालेली नाही, अस मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केल आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना व राष्ट्रावादीनंतर आता काँग्रेसचा नंबर असणार असल्याचे बोलले जात आहे.

‘पांडुरंगाच्या दारात सांगतो, भुजबळांचा पराभव करणारच’ राऊतांचं थेट चॅलेंज!

आता राज्यामध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचबरोबर काँग्रेसचे 16 ते 17 आमदारांचा गट फुटणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीदेखील याबाबत भाकित केले आहे. मागील वर्षी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे मतदान फुटल्याचे समोर आले होते. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी अन् आता काँग्रेसचा नंबर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube