Cm Eknath Shinde : परदेशात निंदा करणं हा राहुल गांधींचा देशद्रोहच…
मुंबई : परदेशात निंदा करणं म्हणजे हा राहुल गांधींचा देशद्रोह असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेल्या अवमानाप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी निषेध केला आहे.
Israel : पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घराबाहेर आंदोलक ; संरक्षण मंत्र्यांची पदावरून हकालपट्टी
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्यागामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. सावरकर फक्त महाराष्ट्राचे दैवत नसून देशाचे दैवत आहेत. त्यांच्याविषयी अवमानजनक बोलणाऱ्या राहुल गांधींसारख्या प्रवृत्तींचा आम्ही निषेध करीत आहोत. त्यांचा निषेध करावा तेवढा कमी असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
मराठी कलाकारांनी राजकारणात, विरोधी पक्षात असावं का ? अमोल कोल्हेंचा प्रश्न
राहुल गांधींकडून वारंवार सावरकरांचा अवमान केला जात आहे. सावरकर होण्यासाठी देशासाठी तेवढा त्याग आणि प्रेम असावं लागतं. परदेशात जाऊन आपल्या देशाची निंदा करणं एक प्रकारचा देशद्रोहच असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. सावरकरांच्या अवमानाप्रकरणी बोलताना चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले आहेत.
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना
राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची निंदा करीत आहेत. परदेशात देशाची निंदा करणं हे दुर्देवी आहे. स्वातंत्र्यसंग्रामाव्यतिरिक्त विविध क्षेत्रांत सावरकरांचं मोठं योगदान आहे. सावरकर हे संपूर्ण देशाचं दैवत आहेत. त्यामुळेच आता त्यांच्या समर्थनात पक्षीय मतभेत विसरुन सावरकरप्रेमी रस्त्यावर उतरल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. काल उद्धव ठाकरेंनी सावरकरांच्या अवमानावर भाष्य केलं. ते त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं म्हटलंय. तसेच राज्यात आता “स्वातंत्र्यवीर सावरकर” गौरव यात्रा सुरु करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केलीय. स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा राज्यातील जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यात मतदारसंघात दौरा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.