‘आरोग्य वारी’ची जागतिक दखल; इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

पंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी 15 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची आरोग्यसेवा करण्यात आली.

Tanaji Sawant

Maharashtra News : पंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी 15 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची आरोग्यसेवा करण्यात आली. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनात राज्याच्या आरोग्य विभागाने नवा इतिहास रचला आहे. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या महाआरोग्य शिबिराची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे. हा विक्रम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. 15 लाखांहून अधिक वारकऱ्यांच्या तपासणीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यात आली. आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी या संकल्पनेतून डॉ. तानाजी सावंत यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे पंढरपूरच्या वारीला एक नवी ओळख मिळाली. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे ज्यामुळे लाखो वारकऱ्यांना तत्काळ उपचार मिळाले.

आनंदाची बातमी! आता विठुरायाचं दर्शन फक्त दोन तासांत; जाणून घ्या, सविस्तर..

आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या महाआरोग्य शिबिरात आषाढी वारीच्या काळात तब्बल 15 लाख 12 हजार 774 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे यशस्वी नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. यासाठी आरोग्य विभागातील वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

पंढरपूरच्या वारीसाठी दरवर्षी पंढरपुरात लाखो वारकरी दाखल होतात. या दिवसांत बहुधा पाऊस सुरू असतो. शेतीची कामं उरकून वारकऱ्यांची पावलं पंढरीकडं वळतात. शेकडो किलोमीटर पायी चालत जाऊन वारकरी पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेतात. या वारीच्या सोहळ्यात अनेकदा आरोग्याच्या सुविधांअभावी वारकऱ्यांची परवड होते. ही गोष्ट लक्षात आल्याने आरोग्य विभागाने यंदा चांगली व्यवस्था केली होती. ठिकठिकाणी आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती.

तसेच या काळात महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन औषधे देण्यात आली. वारकऱ्यांवर औषधोपचार करण्यात आले. अशा पद्धतीने वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली. वारकऱ्यांनीही सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या या उपक्रमाची नोंद इंटरनॅशनल बूक ऑफ रेकॉर्ड्सने देखील घेतली.

दिलासादायक! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दंत उपचारांचा समावेश : आरोग्यमंत्री सावंत

follow us