गर्मी असुद्या कितीही! तुम्ही देशासाठी मतदान करा, मोदींचं सातारकरांना आवाहन

गर्मी असुद्या कितीही! तुम्ही देशासाठी मतदान करा, मोदींचं सातारकरांना आवाहन

PM Modi Sabha In Satara : लोकसभेच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्रर मोदी सर्वात पहिला घाव काँग्रेसव घालत आहेत. आज सातारा येथे लोकसभेचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचार सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हमला केला. (Udayanaraje Bhosale) आपली संपत्ती काँग्रेस मुस्लिम समुदायाला वाटणार आहे. त्यामुळे तुम्ही असं होऊ द्यायचं नसेल तर आम्हाला मत द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे. यावेळी व्यासपिठावर उमेदवार उदयनराजे भोसले (Satara Loksabha) उपस्थित होते.

 

शेतीमध्ये अनेक मोठे बदल करणार

सर्व शेतकऱ्यांच्या शेतिपर्यंत पाणी पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामध्ये लक्ष्मणराव ईनामदार इरिगेशन योजना, पराली प्रोजेक्ट, टेम्पो ईरीगेश प्रोजक्ट या माध्यमातून आम्ही सर्वत्र पाणी पोहचवणार आहोत असंही मोदी यावेळी म्हणाले. तसंच, येणाऱ्या पाच वर्षांच्या काळात आम्ही शेतीमध्ये अनेक मोठे बदल करणार आहोत असा दावाही उपस्थितांसमोर केला.

 

सातारकरांनी आम्हला साथ दिली

आम्ही ऊसावर एफआरपी वाढवली आहे. त्याचबरोबर पीएम किसान योजनेअंतर्गत 1500 कोटी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचा दावाही मोदी यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या 7 मे रोजी सर्वत्र कमळ फुललं पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सातारा जिल्ह्यात मी या अगोदरही आलेलो आहे. त्यामुळे सातारकरांनी आम्हला साथ दिलेली आहे. ते यावेळी देतील अशी अपेक्षाही मोदींनी यावेळी व्यक्त केली.

 

कितीही गर्मी असली तरी मतदान करा

तुमचं स्वप्न हे माझं स्वप्न आहे. आज 24 तास मी काम करत आहे. त्यामुळे आपण घर-घर जाऊन लोकांना सांगा आणि मतदान करा असं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं. त्याचबरोबर, गर्मी कितीही असली तरी आपण मतदानासाठी बाहेर पडा असं आवाहन करत तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन माझा नमस्कार सांगा असं आवाहनही मोदींनी यावेळी उपस्थितांना यावेळी केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज