Manipur Violence : खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची…; भाजपच्या आमदाराने थेट सर्वोच्च न्यायालयालाच शिकवले
Atul Bhatkhalkar on Manipur Violence : जातीय दंगलींमुळे मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालल्याचे चित्र आहे. अशात मणिपूरमधील एका व्हायरल व्हिडीओने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. माणुसकीला लाज आणणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरुन धिंड काढण्यात आल्याचे दिसून आले. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. लोकशाही असलेल्या देशात अशी घटना सहन केली जाणार नाही. असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं. तर त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सर्वोच्च न्यालयाच्या भूमिकेवर मत व्यक्त केलं आहे. ( Supreme Court Shouts Central government on Manipur Violence Atul Bhatkhalkar Put Opinion )
Swanandi Tikekar होणारा नवरा कोण आहे? जाणून घ्या आशिष कुलकर्णीबद्दल…
काय म्हणाले अतुल भातखळकर?
मणिपूर घटनेवरून केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अतुल भातखळकरांनी त्यावर ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा. कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल.’ असं भातखळकर म्हणाले या ट्विटमध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिशांच्या विधानाचा फोटो देखील शेअर केला आहे.
विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड; टॉप-5 दिग्गजांच्या यादीत समावेश
सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?
या व्हायरल व्हिडीओवरुन आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. लोकशाही असलेल्या देशात अशी घटना सहन केली जाणार नाही. जातीय कलहाच्या क्षेत्रात महिलांचा एक साधन म्हणून वापर करणे ही घटनेच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी घटना आहे. जे व्हिडिओ समोर आले आहेत त्यामुळे आम्ही खूप व्यथित झालो आहोत. मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ यात लक्ष घालावे. सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही करू, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.