जो तुम्हाला धमकी देईल त्याला माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा भर सभेत विरोधकांना इशारा

जो तुम्हाला धमकी देईल त्याला माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा भर सभेत विरोधकांना इशारा

Supriya Sule file Lok Sabha Nomination :  लोक दबक्या आवाजात सांगतात आम्हाला फोन आला होता.  आम्हाला धमकी दिली जात  आहे. आता कुणाच्या घरात डुंकून पाहण्याची मला सवय नाही. मात्र, ज्यांचा तुम्हाला फोन आला होता त्यांना माझा नंबर द्या. कारण हे दिल्लीत ज्यांना घाबरतात त्यांच्यासमोर मी आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) ‘डंके की चोट पर’ भाषण करतो. आम्ही कुणाला घाबरत नाही असं म्हणत महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार (Supriya Sule) सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना नाव न घेता इशारा दिलाय. (Baramati Lok Sabha) आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजीत सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

 

 

…तर विरोधकच मला मतदान करतील

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्यावर विरोधक टीका करतात माझ्या 10 वर्षांच्या कार्यकाळात काही कामं झाली नाहीत. परंतु, मी त्यांना सांगते, माझा कार्य अहवाल आपण वाचला नसेल तर एकदा वाचा. तो तुम्हाला मी पाठवते. जर कार्य अहवाल आपण पूर्ण वाचलात तर तुम्हीच मला मतदान कराल असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला. तसंच, माझ्यावर कितीही खालच्या पातळीवर टीका केली तरी मी आपल्यावर पातळी सोडून टीका करणार नाही असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.

 

 

लढाई व्यक्तिच्या विरोधात नाही

माझी ही लढाई कुणाच्या वयक्तिक विरोधात नाही. माझी ही लढाई त्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे जी शक्ती मराठी माणसाच्या मुळावर उठली आहे. आपण पाहत आहोत जे पक्ष फोडले ते मराठी माणसाचेच फोडले. मराहाष्ट्रातील उद्योग पळवले त्यामुळे आपली लढाई व्यक्तिच्या विरोधात नसून महागाई, बेरोजगारीच्या विरोधातील आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना सोबत ताकतीने लढाई जिंकायची आहे, असा विश्वासही सुप्रिया सुळेंनी यावेळी व्यक्त केला.

 

 

मी शारदाबाई पवारांची नात

आम्ही पक्ष बदलला म्हणून आमचं चिन्ह गेलं नाही. तर आमचा पक्ष चोरला, आमचं चिन्ह चोरलं. परंतु, आम्ही नशिबवान आहोत की आम्हाला तुतारी चिन्ह मिळालं. कारण तुतारी हे शुभ कामाचं लक्षण आहे. त्यावेळी पक्ष आणि चिन्ह गेल्याने कुणाला वाटलं असेल  मी रडत बसेल. मात्र, मी शारदाबाई पवारांची नात आहे. मी रडणारी नाही तर लढणारी आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी यावेळी विरोधकांना जोरदार प्रतिउत्तर दिलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube