अक्षय शिंदेची वाहवा करणारे राष्ट्रीय संत ते तुम्हालाच लखलाभ; आव्हाडांनी घेरले सुरेश धसही कडाडले!
![अक्षय शिंदेची वाहवा करणारे राष्ट्रीय संत ते तुम्हालाच लखलाभ; आव्हाडांनी घेरले सुरेश धसही कडाडले! अक्षय शिंदेची वाहवा करणारे राष्ट्रीय संत ते तुम्हालाच लखलाभ; आव्हाडांनी घेरले सुरेश धसही कडाडले!](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-10-at-9.15.33-PM_V_jpeg--1280x720-4g.webp)
Suresh Dhas on Jitendra Awhad for Somnath Suryvanshi death in Parbhani : गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्येप्रकरणी आक्रमक भूमिका घेतलेले आमदार सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टिकेला जोरदार उत्तर दिले आहे. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून आव्हाडांनी धस यांच्यावर टीका केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होतां त्यानंतर धसांनी आक्रमक पवित्र घेतला.
शिंदेंना वगळून आपत्ती व्यवस्थापन समितीत अजित पवारांची वर्णी; फडणवीसांचा दुसरा धक्का
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये धस हे म्हटले की, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणा संदर्भात परभणीमध्ये जवळपास 25 दिवस लॉन्ग मार्च निघाला होता. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी त्या लॉंग मार्चला एकदा तरी संपर्क केला का? मात्र हे आंदोलन थांबण्यासाठी त्यावर मार्ग काढण्यासाठी मी फडणवीस यांची भेटलो ही माझी चूक आहे का?
तानाजी सावंतांचा मुलगा व मित्र विमानाने गेले कुठे ? पोलिसांकडून शोध सुरू
तुम्ही जरी दलित आणि मराठ्यांमध्ये अंतर पाडण्याचा प्रयत्न करत असाल. तरी पण माझ्यासोबत नेहमी दलित बांधव असतात. तसेच आव्हाडांनी माझ्याबाबत बोलताना संत वगैरे शब्द वापरला. मात्र बदलापूरमध्ये ज्याची मुलीवर अत्याचार झाला. त्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ते तुम्हालाच लखलाभ. अक्षय शिंदेची वाहवा करणारे कोणत्या विचाराचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात? याचे प्रमाणपत्र देण्याच्या आवश्यकता नाही. आव्हाड यांनी दुसऱ्यांना शिकवू नये. असं म्हणत ढसांनी आव्हाडांना धारेवर धरल्याचा पाहायला मिळालं.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
दुसर्याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसर्याने येऊन, “जाऊ द्या, त्याला माफ करा”, हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणार्यास कळू नये याला काय म्हणावे. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते.
देशाला पुढे नेण्यासाठी युवाशक्ती ची आवश्यकता, दत्तात्रय भरणे यांचे मत
अर्थात, हा ज्याचा-त्याचा विचार आहे. पण, कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही.ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना कायद्याचा मार बसेलच, याची खात्री आम्ही देतो. एवढेच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.