गुंडाला बळ पुरवण्याचा प्रयत्न! शस्त्र परवान्यावरून सुषमा अंधारेंचा योगेश कदमांवर हल्लाबोल, राजीनाम्याची मागणी

Sushma Andhare : योगेश कदम यांना गृहराज्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

Nilesh Ghaywal

Sushma Andhare demands Yogesh Kadam Resignation : राज्यातील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला शस्त्र परवाना देण्याचा गंभीर आरोप झाला आहे. या प्रकरणात पोलिसांच्या नकारात्मक अहवालानंतरही परवाना मंजूर केल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी केला असून, त्यांनी थेट गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

योगेश कदम यांचे स्पष्टीकरण

या वादावर प्रतिक्रिया देताना मंत्री योगेश कदम यांनी (Yogesh Kadam) स्पष्ट केले की, सचिन घायवळ यांच्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलिस विभागाकडून मिळालेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात Nilesh Ghaywal) कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते.

उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या निर्दोष मुक्ततेच्या आदेशांचा अभ्यास करूनच नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी या अपील प्रकरणाला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल (Sushma Andhare) करणारे आहे. कदम यांनी संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पार पाडल्याचा दावा केला आहे.

सुषमा अंधारे यांचा आरोप आणि फेसबुक पोस्ट

परंतु सुषमा अंधारे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून थेट योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं की, परवाना देताना कोणताही गुन्हा दाखल नव्हता. पण प्रत्यक्षात सचिन घायवळ याच्यावर खुनाचे तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी अशा व्यक्तीला शस्त्र परवाना देऊ नये, असा स्पष्ट अहवाल दिला होता. तरीही कदम यांनी स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करत हा परवाना मंजूर केला.

त्यांनी पुढे अशी मागणी केली की, एका गुंडाला अभय देण्याचा आणि त्याला बळ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या योगेश कदम यांना गृहराज्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

follow us