वाल्मिक कराडबद्दल मोठी अपडेट; फिल्म प्रोड्यूसर असल्याचा निलंबीत कासलेंचा दावा, आयकार्ड समोर

वाल्मिक कराडबद्दल मोठी अपडेट; फिल्म प्रोड्यूसर असल्याचा निलंबीत कासलेंचा दावा, आयकार्ड समोर

Walmik Karad Film Producer : संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात निर्घृण हत्या झाली. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तेव्हापासून एकच नाव सतत चर्चेत आहे, ते म्हणजे या हत्येचा मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड. (Karad) तो अटकेत आहे. दरम्यान, वाल्मिक कराडचे थेट चित्रपट सृष्टीशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड फिल्म प्रोडूसर होता? असा दावा बीड मधील सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे.

संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. गेल्या 3 महिन्यांपासून हे प्रकरण राज्यभरात गाजत आहे. मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांपासून ते राज्यभरातील सर्व नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींपैकी वाल्मिक कराड हा सर्वात चर्चेत आहे. वाल्मिक कराड हा खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे.

Video : देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराड सागंल ते घुलेनी.. कोर्टात काय घडलं? निकम काय म्हणाले?

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडवर अनेक आरोप झाले. कराड याचे सहकारी असलेले सुदर्शन घुले आणि इतर आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यावर वाल्मिक कराडचे अनेक कारनामे समोर आले आहेत. काही वर्षांपूर्वी एक घरगडी असलेला वाल्मिक कराड आज कोट्यावधींचा मालक आहे. पुण्यासह अनेक ठिकाणी त्याच्या कोट्यवधींच्या जागाही आहेत. कराडने जमवलेल्या या संपत्तीची सतत चर्चा होत असते.

हा वाल्मीक कराड फिल्म प्रोडूसर होता, असा दावा बीड मधील सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. याबाबतचे काही फोटोज रणजीत कासले यांनी सोशल माध्यमावर वायरल केले आहेत. यात बीकेसी मधील प्रॉडक्शन ऑफिसचे फोटो त्याबरोबरच आयकार्डचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे.

इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचा वाल्मीक कराड अजीवन सभासद होता. बीआरजे फिल्म प्रोडक्शन ही निर्मिती संस्था असल्याचं समोर आलं आहे. रणजीत कासले यांनी वाल्मीक कराड बाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत, त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube