भाजपची ‘बी’ टीम बीआरएस नसून राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांची टीका

भाजपची ‘बी’ टीम बीआरएस नसून राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांची टीका

T. Harish Rao On NCP : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांच्या बीआरएस (BRS) पक्षाकडून महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून आटापिटा सुरू आहे. त्यामुळं कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीकडून बीआरएसवर भाजपची बी टीम म्हणून टीका केली गेली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शऱद पवार यांनी एका काही दिवंसापूर्वी भारत राष्ट्र समिती ही भारतीय जनता पक्षाची बी टीका असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आता बीआरएस पक्षाचे नेते आणि तेलंगणाचे अर्थमंत्री टी. हरीश राव (T. Harish Rao) यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपची बी टीम असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.

आतापर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यांमध्ये मजबूत पाय रोवणाऱ्या भारत राष्ट्र समितीला (BRS) काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांकडून भाजपची बी म्हणून हिनवले जात होते. पण बीआरएस पक्ष हा ना भाजपचा बी टीम आहे ना काँग्रेसचा. आता शरद पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. तर शरद पवारांनी भाजपची बी टीम कोण आहे, हे सांगाव, असं जाहीर आव्हान टी. हरीश राव यांनी केलं.

गौतम अदानींचे संबंध, भेटीगाठी अन् पुरस्कार; भाजपने फोटो शेअर करुन गांधींना विचारले सवाल 

टी. हरीश राव हे सध्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर भेटीनंतर राव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपची बी टीम बीआरएस नसून राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असं परखड भाष्य केलं.

ते म्हणाले, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस पक्ष हा ना भाजपचा बी टीम आहे ना काँग्रेसचा. हा पक्ष तरुण, महिला, गरीब शेतकरी, नोकरदार, छोटे-छोट व्यापाऱ्यांची मजबूत टीम आहे. त्यांचे साक्षीत्व पाहण्यासाठी अजमावयचे तर तेलंगणात मुख्यमंत्री केसीआर यांनी गेल्या नऊ वर्षांत केलेल्या भरीव स्वरुपात केलेल्या विकासाकडे पाहावे लागेल. तेलंगणात सर्वत्र कृषी सिंचन, पाणीपुरवठा, वीज, रोजगार निर्मिती, रस्ते आदींचा विकास होताना दिसत आहे. याबाबत तेलंगणा आणि महाराष्ट्राची तुलना होऊ शकत नाही, असा दावा राव यांनी केला.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube