कॅसिनोसोबतच्या व्हायरल फोटोचा बडगुजरांवर बोजा; बावनकुळेंना ‘तो’ संशय, भाजप प्रवेश लटकला

Sudhakar Badgujar in BJP : नाशिकमधील ठाकरेंचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांची ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समोर आलं. (BJP) त्यांचा आज प्रवेशही ठरल्याचं सांगितलं गेलं. मात्र, घडामोडी काही वेगळ्याच घडत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रवेशाबाबत काहीच माहिती नाही नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आता वेगळीच चर्चा रंगली आहे.
वाद नेमका काय?
काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माकाऊला कुटूंबासोबत गेले होते. तेव्हा तेथे त्यांचे कॅसिनो खेळतानाचे फोटो खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले होते. त्यामुळं चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान, हे फोटो बडगुजर यांच्या माध्यमातूनच संजय राऊत यांच्यां पर्यंत पोहचवले असे आरोप केले जात होते. त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांचा बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवसेना आजही खंबीर अन् अभेद्यच; ज्यांना जायचं ते गेले, राऊतं बडगुजरांवर काय बोलले?
त्याचबरोबर मुबंई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्तासोबत नाच केल्याचा बडगुजर यांचा व्हिडीओ भाजप मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत सादर केला होता, त्यामुळे बडगुजर यांना थेट देशद्रोही ठरविण्यात आले होते आणि आता त्याच भाजप मध्ये बडगुजर यांचा प्रवेश होत आहे, यामुळे देखील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
बावनकुळे काय म्हणाले होते?
व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, पण एका फोटोमुळे जर कुणाची इमेज खराब करता येते असं जर एखाद्याला वाटत असेल तर ते शक्य नाही. आपण हाँगकाँगला परिवारासोबत गेलो होतो, पण त्या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये कसिनो असतो, त्याला क्रॉस करून जाताना कुणीतरी तो फोटो काढल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं.