राज्यातील साडेतीन लाख युवतींना मिळणार स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील साडेतीन लाख युवतींना मिळणार स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे; राज्य सरकारचा मोठा निर्णय

self defense training : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कितीही कडक कायदे केले तरी महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय झाला. दरम्यान, आता महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला आणि बालकल्याण विभागाने (Women and Child Welfare Department) पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील 3 लाख 50 हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण (self defense training) दिले जाणार असल्याची माहीत महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिली. (Three and a half lakh girls in the state will get ‘self-defense training’!)

https://www.youtube.com/watch?v=BowCJPGZrSo

आज मंत्रालयातील दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री लोढा यांनी सांगितले की, महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त 3 ते 15 जुलै या कालावधीत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आह. अलीकडच्या काळात महिला आणि मुलींवरील होणारे अत्याचार आणि त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे सरकार आणि समाजासमोरील आव्हान बनले आहे. हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे.

Manipur Violence : हिंसाचारामुळे देशाच्या आत्म्याला खोल जखम; सोनिया गांधींचे व्हिडिओच्या माध्यतातून शांततेचं आवाहन 

ते म्हणाले, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राज्यात राबविण्यात येणार आहेत. महिला व बालविकास आयुक्त कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने तालुकास्तरावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण शिबिरे आयोजित करण्याची योजना आखण्यात आल्याचं मंत्री लोढा यांनी सांगितलं.

पहिला दिवस

महिला आणि मुलींवरील हिंसाचार – संकल्पना आणि सद्यस्थिती यावर भारतीय स्त्री शक्ती संस्था मार्गदर्शन करणार आहे. सकाळी 11 ते 12.30 वाजेपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षणात एक हजार मुली सहभागी होणार आहेत.

सायबर सेलचे तज्ज्ञ अधिकारी ‘तंत्रज्ञान आणि महिला व मुलींना असलेले धोके’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत चालणाऱ्या या प्रशिक्षणात एक हजार मुलींचा सहभाग असेल.

दुसरा दिवस-

स्वसंरक्षण प्रशिक्षण वेळापत्रक

स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत असेल आणि 1000 तरुणींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील. आधुनिक प्रशिक्षण सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत होणार असून 1000 युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.

तिसरा दिवस

प्रात्यक्षिक आणि सराव प्रशिक्षण सकाळी 9 ते 9.45 या वेळेत होणार असून 1000 मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील. सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत प्रात्यक्षिक आणि सराव असेल आणि 1000 मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 कोच असतील.

या तीन दिवसीय शिबिरानंतर अधिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणासाठी ज्या इच्छुक मुलींना रुची असेल, अशी युवतींची संख्या लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी विभागामार्फत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube