राज्यातील शाळांच्या वेळा बदलल्या, सरकारकडून जीआर जारी; कसं असणार शाळांचं वेळापत्रक?
School Time Change : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी राज्य सरकारने (State Govt) मोठा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा या सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश सरकारने दिले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने सर्व शाळांना याबातच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयानुसार आता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी राज्यपालांनी राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्राथमिक शाळा उघडण्याची वेळ सकाळी ९ नंतर असावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
भुजबळ माझ्या नादी लागू नको, मंडल आयोग जाईल; मनोज जरांगेंनी धमकावलंच
राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषत: खाजगी शाळा भरण्याची वेळ सहसा सकाळी ७ नंतर भरत असल्याचं दिसून आलं. शिवाय, पालकांच्या म्हणण्यानुसार, सकाळी झोप न झाल्यानं मूलं लवकर उठून शाळेत जाण्यास तयार होत नाही. झोप पूर्ण होत नसल्यानं मुलं दिवसभर आळसलेले दिसून येतात. बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी झालेला दिसून येतो. आणि त्याचा नकारात्मक परिणाम अध्ययनावर होता.
आधुनिक युगात बदललेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेलं ध्वनी प्रदूषण.या कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिरा झोपतात. आणि सकाळी लवकर शाळा असल्यानं लवकर उठतात. मात्र, त्यांची झोप होत नाही. याचा विद्यार्थ्यांच्या शारिरिक व मानसिक आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं विद्यार्थी अनेकदा आजारी पडतात. शिवाय, मुलाला सकाळी लवकर तयार करणं, जेवणाचा डबा पॅक करणं आणि मुलाला वेळेवर शाळेत सोडणं यामुळं अनेक पालकांची ओढताण होते, त्यामुळ हा बदल करण्यात आल्याचं प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे.