Video : युती ठाकरे बंधूंची पण, मानाचं पानं राऊतांना; सुरूवात ते शेवट पत्रकार परिषदेत काय घडलं?

UBT_MNS ठाकरे बंधूंच्या युतीसाठी हॉटेल ब्लू सी निश्चित करण्यात आले होते. त्यापूर्वी रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे शीवतीर्थवर आले.

  • Written By: Published:
Video : युती ठाकरे बंधूंची पण, मानाचं पानं राऊतांना; सुरूवात ते शेवट पत्रकार परिषदेत काय घडलं?

Sanjay Raut Gets Special Tretment In Thackeray Brothers Press Conference : गेल्या वर्षांपासून ठाकरे बंधू एकत्र यावे अशी अवघ्या मराठी जनतेची सुप्त इच्छा होती ती इच्छा अखेर प्रत्यात्रात उतरली असून, आज (दि.24) ठाकरे बंधूंच्या अधिकृत एकत्र येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. पण, या युतीच्या घोषणेत मानं पान मिळालं ते ठाकरे गटाचे खासदार आणि विरोधकांवर थेट हल्लाबोल करणाऱ्या संजय राऊतांना (Sanjay Raut). कारण या दोन्ही पक्षांची आणि बंधूंना एकत्र आणण्याचे शिल्पकार म्हणून संजय राऊतांकडे पाहिले जात आहे.

20 साल बाद! उद्धव-राज युती भाजप-महायुतीसाठी डोकेदुखी; मतदारांच्या आकड्यांचं ‘गणित’ चक्रावणारं

शीवतीर्थवर दोन्ही भावांचे औक्षण

शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीसाठी वरळीतील हॉटेल ब्लू सी निश्चित करण्यात आले होते. त्यापूर्वी रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे राज ठाकरेंच्या शीवतीर्थवर दाखल झाले. येथे राज ठाकरे यांच्या मातोश्रींनी दोन्ही बंधूंचे औक्षण केले. त्यानंतर ठाकरे कुटुंबाने एकत्रित बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. Sanjay Raut Gets Special Tretment In Thackeray Brothers Press Conference

हॉटेल ब्लू सी मध्ये तुडुंब गर्दी

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांचे वरळीतील हॉटेल ब्लू सी येथे आगमन झाले. याठिकाणी ऐतिहासिक युतीची घोषणा ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी पाहण्यास मिळाली. ज्यावेळी मंचावर राज आणि उद्धव आले. त्यावेळी स्वतः राज ठाकरेंनी संजय राऊतांना मंचावर बोलवून घेतले. युतीच्या घोषणेवेळीदेखील राऊत दोन्ही ठाकरे बंधूंच्यासोबत अगदी सावली सारखी उभे असल्याचे पाहण्यास मिळाले. एवढेच काय तर, पत्रकार परिषदेची सुरूवातदेखील राऊतांनी केली.

‘तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका’ युतीच्या घोषणेवेळी महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंचा संदेश

कौटुंबिक फोटोतही राऊतांना स्थान

एवढेच नव्हे तर, राज ठाकरेंकडून युतीची घोषणा झाल्यानंतरदेखील ज्यावेळी ठाकरे कुटुंबिय एकत्रित फोटोसाठी मंचावर आले त्यावेळीदेखील राज यांनी राऊतांना दोघांच्या मधोमध उभे केले. तर, आदित्य ठाकरे यांनी काकू शर्मिला ठाकरे यांना मंचावर येण्याची विनंती केली. त्यावेळी रश्मी ठाकरे या राज ठाकरेंच्या बाजूला तर, रश्मी वहिनी राज ठाकेरेंच्या बाजूला फोटोसाठी उभ्या राहिल्या. तर, आदित्य आणि अमित ठाकरेंनी दोन्ही काकूंच्या बाजूला उभे राहत फोटोसाठी पोज दिली.

follow us