Uddhav Thackeray : बारसूत ठाकरे पुन्हा कडाडले; म्हणाले, शिंदेंच्या खुर्चीचे पाय…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 06T144028.441

Uddhav Thackeray at Eknath Shinde :  ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आज बारसू येथे आले होते. यावेळी त्यांनी बारसू येथील ग्रामस्थांशी संवाद साधला असून  रिफयनरीवर भाष्य केले आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी शिंदे सरकारची भूमिका आहे, असे ठाकरेंनी म्हटले आहे.

राज्यातील शिंदे सरकार बहुतेक कोसळेल. पावलं मागे नाही घेतले तरी त्यांच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत, असे ठाकरेंनी शिंदेंना उद्देशून म्हटले आहे. बारसू प्रकल्पाला विरोध असूनही शिंदे सरकार मागे हटायला तयार नाही. उलट एक पाऊल पुढेच टाकत आहे. मी पत्र दिले होते. पण त्या पत्रात असा कुठेही उल्लेख नव्हता की, येथील लोकांची डोकी फोडा, असे ठाकरे म्हणाले आहेत.

‘ते आलेत दोन नंबरला बसलेत आता, शिंदेंना ढकलून’.. फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांचे टोले

माझ्या कालावधीत केंद्राने चांगले प्रकल्प गुजरातला दिले. तेव्हा हे शेपूट घालून बसल होते आता जनतेच्या घरावर उपऱ्यांची सुपारी घेऊन वरवंट फिरवताना लाज वाटली पाहिजे. बळ न वापरता लोकांसमोर जा, असं आव्हान ठाकरेंनी सरकारला दिले आहे.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

माझ्याकडे कागदपत्रांचा गठ्ठा आहे. ग्रामपंचायतीचे ठराव आहेत, असं मला सांगण्यात आलं होतं, अशी माहिती ठाकरेंनी दिली. तसेच माझ्या कालावधीमध्ये एअर बस व वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला का दिले? हा प्रकल्प गुजारातला न्या. वेदांत फॉक्सकॉन इतर प्रकल्प महाराष्ट्राला द्या. गिफ्ट सिटी महाराष्ट्राला द्या. चांगल्या गोष्टी गुजरात आणि दिल्लीला दिल्या व इतर प्रकल्प महाराष्ट्राला दिले आहेत, असा घणाघात त्यांनी केला आहे.

follow us