पक्षातील विरोधाने पतीचा जीव गेला, माझा जाऊ देणार नाही; आमदार धानोरकरांचा गंभीर आरोप

पक्षातील विरोधाने पतीचा जीव गेला, माझा जाऊ देणार नाही; आमदार धानोरकरांचा गंभीर आरोप

Pratibha Dhanorkar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांमध्ये पक्षांतराचे वारे वाहत आहेत. त्याचबरोबर जागावाटप आणि उमेदवारीच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत राजकारण देखील समोर येत आहे. यातच आता काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर ( Pratibha Dhanorkar ) यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की पक्षातील विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव गेला. मात्र दुसरा जीव जाणार नाही. याची मी काळजी घेईल.

वसंत मोरे पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार? चर्चा तर तशाच होताहेत…

आमदार धानोरकर या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. मात्र आपण कुठेही जाणार नसल्याचे म्हणत धानोरकर यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच त्या म्हणाले की, माझ्यावर आरोप करणारे नेते स्वतः भाजपमध्ये जाणार आहेत. मात्र अफवा माझ्याबद्दल पसरवल्या जात आहेत. तसेच मी कुठेही जाणार नसून मी काँग्रेसचेच तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. धानोरकर या चंद्रपुरातील एका कार्यक्रमांमध्ये बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

विद्या बालनच्या ‘दो और दो प्यार’ची रिलीज डेट; ‘या’ दिवशी करणार बॉक्स ऑफिसवर कल्ला

तसेच यावेळी बोलताना त्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाबाबत गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या माझ्याच पक्षातील काही लोक माझ्या विरोधात असून त्याच विरोधामुळे माझ्या पतीचा जीव गेला. ते लोक आता माझ्या मागे लागले आहेत. मात्र दुसरा जीव जाणार नाही याची मी काळजी घेईन. तर यावेळी आपल्या लोकसभा उमेदवारीबद्दल सांगताना धानोरकर म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाचे प्रभारी चेंनिथला त्यांच्यासोबत आपली मतदारसंघाबाबत चर्चा झाली आहे. मात्र पक्षांमध्ये वेळ येईपर्यंत कोणताही निर्णय घेतले जात नाही.

त्यामुळे अद्याप मला तसे निर्देश देण्यात आलेले नाहीत. मात्र मी माझी तयारी सुरू केली आहे. तर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्याबद्दल बोलताना धानोरकर म्हणाल्या की शिवानी वडेट्टीवार या माझ्या प्रतिस्पर्धी नाहीत. तिकीट मागण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. तसेच दिल्लीला शिष्टमंडळ नेलं म्हणजे तिकीट मिळतं असं नाही. असा टोला देखील यावेळी त्यांनी लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज