छत्रपती संभाजी महाराज 16 भाषा शिकले मग ते..,; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली…

Mla Sanjay Gaikwad : राज्यात सध्या हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन चांगलंच वादंग पेटल्याचं दिसून येत आहे. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून मुंबईत मोर्चा काढण्यात येणार होता. हा मोर्चा निघण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विजयी सभा घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Mla Sanjay Gaikwad) यांनी जीभ घसरलीयं. छत्रपती संभाजी महाराज 16 भाषा शिकले मग ते मुर्ख होते का? असा थेट सवाल गायकवाड यांनी मुंबई तक या वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.
अमेरिकेच्या राजकारणात मोठं वादळ! एलन मस्कने केली नवीन पक्षाची स्थापना, ट्रम्प सरकारला दणका
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, आपण परराज्यात गेल्यावर तुम्ही मराठी बोलणार आहात का? तुमच्या मुंबई, ठाणे पुण्यात के-जी 1, 2 च्या इंग्रजीच्या शाळेत शिकता तुम्ही तिथं तुम्हाला हिंदी सक्तीचं आहे मग तिथं तुम्ही हिंदी शिकायला नाकारता का? सांगा मला कोण मुंबई ठाण्यावाला नाकारतो का? आज जगात टिकायचं असेल तर सगळ्याचं भाषा अवगत पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या मग ते मूर्ख होते का? असा थेट सवाल गायकवाड यांनी केला आहे.
इंदुरीकर महाराजांच्या हास्य-विचारांची वारीला तरुणांची गर्दी; प्रोमोने पार केलं 1M+ व्ह्यूज!
तसेच छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते, ताराराणी, येसुबाई, जिजाऊ मॉंसाहेब यांनीही अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषेसह ते लोकं मूर्ख होते का? हिंदी भाषेवरुन वाद करुन मतांच राजकारण सुरु हे चुकीचं पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दूपण अवगत असायला पाहिजे, असंही संजय गायकवाड म्हणाले आहेत.
आम्ही मराठीसाठी गुंड आहोत : संजय राऊत कडाडले, मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल…
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेवरुन वादंग सुरु आहे. महायुती सरकारने त्रिभाषा सुत्रानुसार हिंदी भाषा सक्तीची केल्यानंतर विरोधकांकडून कडाडून विरोध झाला. त्यानंतर राज ठाकरे यांनी मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. या मोर्चाला विरोधकांसह उद्धव ठाकरेंनीही समर्थन दिल्यानंतर महायुती सरकारने एक पाऊल मागे येत हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतला, आणि डॉ. नरेंद्र जाधव समितीची स्थापना केली.
महायुती सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर आवाज मराठीचा या बॅनरखाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विजयी सभा घेत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर आज सत्ताधारी पक्षातील आमदारांकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचा विरोध करीत सडकून टीका करीत आहेत. मात्र, टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरलीयं. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विधान केल्याने आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.