नगरकरांना दहशत अन् गुंडगिरीच्या जाचातून मुक्त करा; भाजपच्या पदाधिकाऱ्याची थेट फडणवीसांकडे मागणी

नगरकरांना दहशत अन् गुंडगिरीच्या जाचातून मुक्त करा; भाजपच्या पदाधिकाऱ्याची थेट फडणवीसांकडे मागणी

अहमदनगर शहरात गुंडगिरी आणि दहशत माजवणाऱ्यांवर कडक कारवाई करुन नगरच्या जनतेला गुंडांच्या जातातून मुक्त करण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीय. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्याकडे कडक कारवाईची मागणी केली आहे.

टायटॅनिकचे अवशेष शोधण्यासाठी गेलेली पाणबुडीही बेपत्ता, 96 तासांचाच ऑक्सिजन शिल्लक…

भाजपचे माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांनी निवेदनात म्हटले की, अवैध धंद्याची माहिती पोलिसांना दिलेच्या कारणावरुन हिंदुत्ववादी कार्यकर्ते ओंकार भागानगरे यांच्यावर तलवारीने वार करुन हल्ला करण्यात आला आहे. तर या घटनेत शुभम पाडळे जखमी झाला आहे. आरोपी गणेश हुच्चे, नंदु बोराटे, संदीप गुडा यांनी हा हल्ला केला असून आरोपी शहराच्या आमदारांचे जवळचे कार्यकर्ते आहेत.

News Arena India Survey : नागपूरात केदार, राऊतांचे गड सुरक्षित पण शरद पवारांच्या शिलेदाराला धक्का

अहमदनगरमध्ये जागा बळकावणे, अतिक्रमण करणे, मुस्लिम समाजाला पाठबळ देणे, यासोबतच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या प्रकरणी लक्ष घालून गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी लोढा यांनी केला आहे.

News Area India Survey : पंकजांसाठी ‘परळी’ अवघडचं; नवा मतदारसंघ शोधावा लागणार?

तसेच राज्यात जरी भाजपा सेना युतीचे सरकार असले तरी दुर्दैवाने नगर शहरातील विरोधी पक्षाचे आमदार व स्थानिक पोलीस अधिकारी यांच्यात लागेबांधे असल्याचा आरोप लोढा यांनी केला आहे. आमदार स्वतःच्या नात्यागोत्याच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव टाकत असून भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, काल रात्रीच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावर रुबाब कलेक्शनसमोर तरुणांवर हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात ओंकार भागानगरे याचा मृत्यू झाला तर एक शुभम पाटोळे जखमी झाला आहे. गणेश हुच्चे याचे कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे सुरु होते. या धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात ओंकार भागानगरे या तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube