“पाच वर्ष कामं करा तिकीट मिळवा, घरातल्या कार्यालयात बसून..” शालिनीताई पाटलांनी टोचले नातवाचे कान

“पाच वर्ष कामं करा तिकीट मिळवा, घरातल्या कार्यालयात बसून..” शालिनीताई पाटलांनी टोचले नातवाचे कान

Sangli Lok Sabha Election : मतदारसंघात बंडखोरीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशाल पाटील यांच्या पीएने उमेदवारी अर्ज घेतला आहे. विशाल पाटील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणार आहेत. तसेच काँग्रेसकडून उमेदवारीसाठी ते अजूनही आग्रही आहेत. दरम्यान, विशाल पाटील यांनी जर हा निर्णय कायम ठेवला तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे. दरम्यान, या घडामोडींवर दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी नातवाचे कान टोचले आहेत.

शालिनीताई म्हणाल्या, मला वाटतं चंद्रहार पाटील निवडून येतील. विशाल पाटील यांच्याबाबत मी काही बोलले नाही. विशाल पाटील यांच्या उमेदवारीला आता उशीर झाला आहे. ठाकरे गटाच्या निर्णयाला महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनीही मान्यता दिली आहे. दिल्लीतही आता फेरविचार होण्याची शक्यता नाही.

Sangli Loksabha : सांगलीची जागा ठाकरे गटाला कशी गेली? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

जो कुणी चंद्रहार पाटील यांच्याविरोधात निवडणुकीसाठी इच्छुक आहे त्याला मी इतकंच सांगेन की उमेदवारीसाठी पाच वर्षे अगोदरच तयारी करावी लागते. सार्वजनिक ठिकाणी कामं करावी लागतात. घरातल्या कार्यालयात बसून निवडणुकीला उभे राहता येत नाही. कुणाचे नातेवाईक आहात इतकंच उमेदवारी मिळण्यासाठी पुरेसं नाही.

लोकांशी संपर्क ठेवावा लागतो. लोकांची कामं करून निवडणुकीच्या काळात लोकांसमोर गेलात तर लोकांचंही तुमच्याबद्दल चांगलं मत तयार होतं. त्यानंतर तुम्ही तिकीट मागायला हवं. पाच वर्षे काम करा पक्षानं तिकीट दिलं तर निवडणुकीत उभे राहा. कारण अपक्ष लढण्यात काही अर्थ नाही, असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.

सांगलीत नवा डाव! महाविकास आघाडीला धक्का देत विशाल पाटील भरणार अपक्ष अर्ज...

दरम्यान, महाविकास आघाडीत सांगली मतदारसंघ चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाने काँग्रेसकडून अक्षरशः हिसकावून घेतला. उमेदवारही जाहीर केला. ठाकरे गटाची ही चाल काँग्रेस नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांनीही मतदारसंघ मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. थेट दिल्ली गाठली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. परंतु, या कशाचाच उपयोग झाला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube