पक्षाची साथ सोडणाऱ्या 6 खासदारांवर काय कारवाई होणार? अरविंद सावंत स्पष्टच म्हणाले

Arvind Sawant On Operation Tiger : शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडली असून त्यांनी नवीन गट स्थापन केला असल्याचा दावा

Arvind Sawant On Operation Tiger

Arvind Sawant On Operation Tiger : शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडली असून त्यांनी नवीन गट स्थापन केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. ऑपरेशन टायगर (Operation Tiger) अंतर्गत ठाकरे गटातील 6 खासदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असं देखील सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे या सहा खासदारांना संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच या खासदारांना अपात्र ठरवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून तयारी सुरु करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले की,  रविवारी झालेल्या बैठकीत सर्व खासदार, नेते उपस्थित होते. त्यावेळी एकानेही स्वत:हून सांगितलं नाही की आम्ही पक्ष सोडतोय. आमचा आमच्या खासदारांवर विश्वास आहे, पण ज्याप्रमाणे चर्चा होतेय, बातम्या येत आहेत, त्यावरुन आम्ही संविधानानुसार सावधगिरी बाळगत आहेत. कलम 10 नुसार पक्ष किंवा गट विलीन होत असतो. व्यक्ती होत नाही, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्यानुसार आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र दिले आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. खासदार म्हणजे पक्ष नसते आमदार म्हणजे पक्ष नसते असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अरविंद सावंत म्हणाले.

पुढे बोलताना खासदार सावंत म्हणाले की, पक्ष कार्यकर्त्यांच्या जोरावर बनत असतं. संविधानांतर्गत पक्षांतर्गत फुटीला कोणतीही कायदेशीर मान्यता नसल्यामुळे, कोणत्याही बंडखोर गटाला स्वतंत्र मान्यता दिली जाऊ नये असं अध्यक्षांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटलं असं देखील सावंत म्हणाले.

ठाकरेंनंतर शरद पवारांना धक्का, 3 खासदार NDA च्या वाटेवर?-

तर दुसरीकडे पक्षांतरबंदी कायद्यानुसार, स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आमदार किंवा खासदार संख्येच्या एकूणम संख्याबळाच्या दोन तृतीयांश संख्याबळाची गरज असते. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे या गटाला अधिकृत मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

follow us