CM शिंदे संशयी आत्मा; भलत्यालाच फासावर लटकवलं का?; राऊतांकडून प्रश्नांची सरबत्ती
मुंबई : दोन वर्षांपूर्वी राज्यात आरोपीने बलात्कार केला होता. आम्ही फास्ट ट्रॅक खटला चालवला आणि दोन महिन्यांपूर्वी आरोपीला फाशीची शिक्षा झाली असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केले होते. त्यांच्या या विधानावरून आता राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भलत्यालाच फासावर लटकवलं का? असे एक न अनेक प्रश्नांची सरबत्ती करत एकनाथ शिंदेंना कात्रीत पकडलं आहे.
बदलापूर प्रकरण : अक्षय शिंदे गतीमंद? तीन लग्न झालीत का?; आई-वडिलांच्या दाव्याने नवा ट्विस्ट
मुख्यमंत्री संशयी आत्मा
मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानावर बोलताना राऊतांनी मुख्यमंत्री हा एक संशयी आत्मा आहे. त्यांचा अर्धा दिवस संशयकल्लोळ, जादूटोणा, मंत्रतंत्र, अंधश्रद्धा यात जातो अशी बोचरी टीका केली आहे. बदलापुरातील आंदोलन हाही त्यांना जादूटोणा वाटला असेल, कारण ते जादूटोणाप्रेमी असल्याचेही राऊत म्हणाले. बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर शहरात झालेले जनआंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं शिंदे म्हणाले होते त्यावर राऊतांनी सणसणीत टीका केली आहे.
मोठी बातमी : जरांगेकडून भाजपला सुरूंग! बड्या नेत्याने बीडमधून जरांगेंकडे मागितली उमेदवारी
तपशील जाहीर करा
शिंदेंनी डोळे नीट उघडले की, दिसेल बदलापूर घटनेचे पडसाद राज्यभर दिसले आहे. एकाच वेळेला एवढी लोकं तुमच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले जिथे तुमचा मुलगा खासदार आहे. तुम्ही आणि तुमचा मुलगा आंदोलकांच्या साध्या भेटीला देखील गेला नाही. एवढे तुम्ही घाबरलेले आहात का? असा प्रश्नही राऊतांनी विचारला आहे.
शिंदेंनी नुकत्याच केलेल्या दोन वर्षांपूर्वी महिन्यात फाशीच्या विधानाव बोलताना राऊत म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रामध्ये अशीच एक घटना घडली पण आम्ही ती फास्टट्रक वर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यापूर्वी फाशी दिल्याचे म्हटले. त्यावर मुख्यमंत्र्यानी कोणत्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली ? ते सांगावं. कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला, कोणत्या न्यायालयात संबंधीत आरोपीला फासावर लटकवलं आणि कोणत्या कारागृहात या संबंधीत आरोपीला फाशी दिली. याचा तपशील जाहीर करावं असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्रापासून तुम्ही काही लपवलं आहे का? फाशीची जागा त्यांनी सांगावी , वर्षाबंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या? फाशीची शिक्षा देण्यासाठी त्यांची राजभवनामध्ये त्यांची नोंद करावी लागते राज्यपालांचा आदेश काढावा लागतो असे अनेक प्रश्न राऊतांनी उपस्थित करत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी गांर्भियाने घ्यावं असे आवाहन केले आहे.