‘नाना पटोलेंच्या कारभाराला कंटाळून मोठ्या प्रमाणात सोडचिठ्ठी’, आशिष देशमुखांची खोचक टीका
Ashish Deshmukh On Ashok Chavan Resignation : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan ) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजत आहे. नांदेडमधील राजकारणात तशी मोठी चर्चाही सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याचं देखील सांगितल जात आहे. मागील काही वेळापासून अशोक चव्हाण यांचा फोनही नॉट रिचेबल आहे, त्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे.
यावर आता भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले की, नाना पटोलेंसारखे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसकडे आहे, त्यांच्या कारभाराला कंटाळून मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नेते सोडचिठ्ठी देताना पाहायला मिळतील. नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नामशेष झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्वाचा पडसाद असा होईल की, राज्यसभेच्या सहाच्या- सहा जागा महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही, अशी खोचक टीका नाना पटोलेंवर केली आहे.
पत्रात नेमकं काय? महोदय, मी दिनांक १२/०२/२०२४ मध्यान्हानंतर पासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याव्दारे सादर करीत आहे. धन्यवाद.. आपला विश्वासू, असे तपशीलमध्ये लिहल्याचे दिसत आहे.
अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्य झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
Vishwajeet Kadam : आपण कॉंग्रेसमध्येच! राजीनाम्याच्या चर्चांवर विश्वजीत कदम यांनी स्पष्टच सांगितलं
चव्हाणांसोबत कोण कोण? काँग्रेस पक्षाच्या सदसत्वाचा आणि आमदारकीच्या राजीनाम्यात चव्हाणांसोबत असणाऱ्या काही काही नेत्यांची नावे समोर आली आहे. यात मुंबईतील दोन नावे असून, अमीन पटेल, अस्लम शेख, सुलभा खोडके, विश्वजीत कदम, माधव जवळकर, जितेश अंतापूरकर, अमित झनक, अमर राजूरकर आणि हिरामण खोसकर हेदेखील चव्हाणांची साथ देत राजीनाम देणार असल्याचे सांगितले जात आहे. आता हे सर्वजण भाजपसोबत जाणार की अजितदादांसमोबत जाणार याचीही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वरील नावांशिवाय माजी मंत्री डी.पी. सावंत आणि माजी खासदार खतगावर हेदेखील चव्हाणांसोबत असल्याचे सांगितले जात आहे.