शरीरातून करत होती कोकेनची तस्करी! मुंबई विमानतळावर कॉंगो महिलेला अटक

शरीरातून करत होती कोकेनची तस्करी! मुंबई विमानतळावर कॉंगो महिलेला अटक

Congo woman arrested at Mumbai airport for smuggling cocaine : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोकेनची तस्करी करणाऱ्या एका परदेशी महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. सदर महिला डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या देशाची नागरिक आहे.ती आपल्या शरीरात कोकेन कॅप्सूलच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी 44 लाख रुपयांची तस्करी करत होती. मात्र तिचा प्रकार उघडकीस आला आहे.

स्थानिकांच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री सचिवालयाच हस्तक्षेप, जालन्यातील खरपुडी प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश

महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) ने या महिलेकडून 544 ग्रँम कोकेन कँप्सूल जप्त केल्या आहेत. तीने या कॅप्सूलमध्ये कोकेन भरुन त्या कँप्सूल आपल्या शरीरात लपवल्या होत्या. या कँप्सूलमध्ये भरुन शरीरातून लपवून आणलेल्या कोकेनची किंमत सुमारे पाच कोटी 44 लाख रुपये आहे.

लाडक्या बहि‍णींनो लक्ष द्या! योजनेचे नवीन निकष जाहीर…’तर’ ठरणार अपात्र

डीआरआय च्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीचा वापर करुन डीआरआयने सदर संशयित महिला अदिस अबाबा येथून मुंबई विमानतळावर उतरताच तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली व तिची तपासणी केली. त्यामध्ये तिने तिच्या शरीरात लपवून आणलेल्या कोकेनची डीआरआयला माहिती दिली. याबाबत सदर महिलेला दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले व त्यांनी वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले.

वैद्यकीय तपासणीनंतर या महिलेच्या शरीरात लपवून आणलेले कोकेन बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर कोकेन हा अंमली पदार्थ नार्कोटिक ड्रग्ज अँन्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा (एनडीपीएस) अन्वये ताब्यात घेण्यात आला. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी डीआरआय कडून सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोणत्या संघटनेचा सहभाग आहे का याचे धागेदोरे तपासले जात आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube