मोठी बातमी! दादरच्या हनुमान मंदिराच्या नोटीसीला स्थगिती, रेल्वेने घेतली माघार

  • Written By: Published:
मोठी बातमी! दादरच्या हनुमान मंदिराच्या नोटीसीला स्थगिती, रेल्वेने घेतली माघार

Dadar Hanuman Mandir : दादर परिसरातील हनुमान मंदिराला (Dadar Hanuman Mandir) पाडण्यासाठी नोटीस मिळाली होती. या प्रकारावरून जोरदार राजकारण सुरू झालं होतं. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. शिवसेना ठाकरे गटाने एक है तो सेफ है म्हणतात पण, मंदिरही सेफ नाहीत अशी टीका केली होती. भाजपने (BJP) देखील या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ठाकरे शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकर (Aditya Thackeray) आज याच हनुमान मंदिरात (Hanuman Temple) महाआरती करणार होते. मात्र त्याआधीच मंदिराला मिळालेल्या नोटिसला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे.

काँग्रेसचं चाललंय काय? आमदार अन् उमेदवारांची बैठक; पराभवाचं उत्तर मिळणार.. 

हनुमान मंदिराला नोटीस मिळाल्यानंतर आमदार मंगलप्रभात लोढा यांनी माहिती घेतली. यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर या नोटीसीला स्थगिती मिळाली. या मंदिरात हनुमान मंदिरात नित्यपूजा आणि आरती सुरुच राहणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

Kareena Kapoor : गुलाबी ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये खुललं करीनाचं सौंदर्य, चाहत्यांच्या खिळल्या नजरा…. 

लोढा म्हणाले, केंद्र आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे आणि लोकांचे ऐकणारे सरकार आहे. हिंदू समुदायाची या मंदिराबाबतची भावना आम्ही जाणतो. त्यामुळे या पवित्र स्थानाला कोणताही धक्का लागणार नाही, असे आश्वासन मी देतो. या मंदिराबाबत समजल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते, बजरंग दलाचे आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आम्ही सर्वच केंद्रीय रेल्व मंत्री अश्विन वैष्णव यांच्या संपर्कात होतो. मंदिराचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. या पुढे सुद्धा नेहमीच करु. धार्मिक आस्थेच्या विषयाचे राजकारण करण्याचा काहींचा मानस सफल होण्याआधीच आम्ही मंदिर वाचवण्यात यशस्वी झालो, असं ते म्हणाले.

दरम्यान, या नोटीसीवरुन ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता. ठाकरे गटाचे नेते यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका करत होते. परंतु, आता नोटीसीला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे आता यावर ठाकरे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube