आम्ही उज्जल निकमांच्या बाजूने तर कॉंग्रेस-शिवसेना कसाबच्या बाजूने…; फडणवीसांचे टीकास्त्र
Devendra Fadnavis on Congress : कॉंग्रेस (Congress) पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना (Shivsena)अजमल कसाबच्या बाजूने आहे, तर आम्ही उज्जल निकम (Ujjal Nikam) यांच्या बाजूने आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं.
फडणवीसांचे 50 दिवसांत सभांचे तुफानी शतक ! दोनशेच्या स्टाईक रेटने विरोधकांवर हल्लाबोल
महायुतीचे उत्तर – मध्य मुंबईचे उमेदवार उज्जल निकम यांच्या प्रचारार्थ आज आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलतांना फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, २६/११ चा हल्ला आठवा. दहा आतंकवादी देशात घुसतात आणि मुंबईला हादरून टाकतात. निरापराधांना मारतात. हेमंत करकरे, कामठे, साळसकर यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना कसाबसारखा आतंकवादी शहीद करून टाकलं. मात्र, तत्कालीन सरकार फक्त मूग गिळून गप्प बसलं, अशी टीका फडणवीसांनी केली.
मराठे जातीयवादी असते तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले असते का? मनोज जरांगे
पुढं बोलतांना ते म्हणाले, पाकिस्तान देशात आतंकवादी हल्ले करायचं. तेव्हा सरकार फक्त निषेध करायचं. मनमोहन सिंगांच्या सरकारन २००८ साली मुंबईवर हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानचा निषेध केला. पाकिस्तानने पुन्हा पुण्यात बॉम्बस्फोट केला, मग कॉंग्रेसने तीव्र निषेध केला. आतंकवाद्यांनी मुंबईच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्पोट केला. कॉंग्रेसने पुन्हा अतितीव्र निषेध केला. असेच हल्ले होत राहिले, मग मनमोहन सिंग अमेरिककडे गेले आणि पाकिस्तानला रागवा, ते हल्ले करतात, अशी गयावया करायला लागले. मात्र, २०१४ ला मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर मोदींनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकट स्ट्राईक केला. २०१९ नंतर या देशात बॉम्बस्फोट करण्याची हिमंत पाकिस्तानच्या बापाचीही झाली नाही, असं फडणीस म्हणाले.
उज्जल निकम यांनी उमेदवारी दिल्यानंतर कॉंग्रेसने आपला फणा बाहेर काढला. कॉंग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. कसाब बेकसूर आहे, त्याने गोळी मारली नाही, असं पाकिस्तान सांगायचं. मात्र, उज्जल निकम यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन पुरावे आणले आणि कसाबला फासावर लटवकलं. आम्ही उज्जल निकम यांच्या बाजूने आहोत, तर कॉंग्रेस पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना अजमल कसाबच्या बाजूने आहे, अशी टीका फडणीसांनी केली.